अभिनेते अनुपम खेर,परिणीती चोप्राआदी मान्यवर सहभागी
मुंबई-एकंदरीत १० दिवसांचा गणेशोत्सव सोहळा हा चांगल्या पद्धतीने पार पडला. तथापि गणेशमूर्ती विसर्जनानंतर मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर दिसणारे दृश्य हे उदासीनतेचे दिसते कारण विसर्जनानंतर मूर्तीचे अवशेष आणि प्लास्टिक हे सारं काही किनाऱ्यावर जमा होते.
शहर नागरी प्राधिकरणाच्या प्रयत्नांना पाठिंबा देताना, गणपती विसर्जनानंतर शहरातील समुद्रकिनाऱ्यांच्या चिंताजनक समस्येबद्दल जनजागृती करण्याच्या प्रयत्नात, अमृता फडणवीस (दिव्यज फाउंडेशनच्या) आणि भामला फाउंडेशनचे संस्थापक आसिफ भामला यांनी१० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईतील जुहू बीचवर स्वच्छता मोहिम राबवली.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेले, मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते या उदात्त उपक्रमाला हिरवा झेंडा दाखवून सुरवात झाली. त्याच सोबत या ठिकाणी बीएमसी आयुक्त श्री. इक्बाल सिंग चहल, मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसाळकर, श्रीमती. पूनम महाजन, जुहूचे आमदार श्री अमीत साटम आणि महाराष्ट्र विधानसभेचे प्रवक्ते राहुल नार्वेकर यांसाहित अनेक मान्यवर उपस्थित होते.
राजकारणाच्या क्षेत्रातील नामांकित नावांव्यतिरिक्त, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि परिणीती चोप्रा, अपारशक्ती खुराणा यांच्यासह काही उल्लेखनीय नावांनीही स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. विशेष म्हणजे २००० हून अधिक स्वयंसेवक या उदात्त हेतूसाठी मदतीचा हात देण्यासाठी पुढे आले.
याच कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असलेल्या अमृता फडणवीस त्यांचे मत व्यक्त करताना म्हणाल्या,
स्वतःला आणि पर्यावरणाला स्वच्छ ठेवणे ही मूलभूत गरज आहे आणि या बद्दलची शिकवण आपल्याला लहानपणापासून देण्यात आली आहे. स्वच्छतेचे धडे गिरवून त्यांना आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात लागू करणे हा एकमेव उपाय आहे. जेणेकरून आपण मातृ निसर्गाच्या संसाधनांचा पूर्ण आनंद घेऊ शकतो, आपल्या मुलांना शुद्ध शांत पर्यावरण देऊ शकतो आणि सागरी जीवन निर्मल बनवू शकतो.
प्लॅस्टिकचे दीर्घकाळ विघटन होत नसल्यामुळे, आपल्या अन्न आणि पाण्यात प्लास्टिकचे सूक्ष्म कण आधीच दिसून येत आहेत आणि जर हे थांबले नाही तर ते निसर्गासोबत आपल्यासाठी सुद्धा धोक्याचे आहे.
ज्या पद्धतीने आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रीदवाक्य आहे ना खाऊंगा ना खाने दुंगा, त्याचप्रमाणे आपण सुद्धा मनाशी घट्ट केलं पाहिजे की, ना कचरा करुंगा ना करणे दुंगा.
तसं ही आपल्या भारतीय संस्कृतीत असे मानले जाते की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नांदते.याच बरोबर उपस्थित भामला फाउंडेशनचे संस्थापक असिफ भामला यांनी सगळ्या नागरिकांचे कौतुक करताना म्हणाले की, स्वच्छता मोहीम राबवत असता, जुहू समुद्रकिनाऱ्यावड येणाऱ्या आणि तिथे राहणाऱ्या सगळयाच नागरिकांनी अगदी रात्री पासून ते पहाटे पर्यंत ही किनारपट्टी साफ करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे, ज्याचे त्यांना खूप कौतुक आहे.