मुंबईचा बंगाल होऊ देणार नाही! – मंगल प्रभात लोढा

Date:

मुंबई-महाराष्ट्रातील नांदेड, अमरावती, मालेगाव येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटना दुर्देवी असून आम्ही त्यांच्या निषेध करतो. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर हिंसक घटना वाढत असून मुंबईचा बंगाल होऊ देणार नाही असा इशारा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी दिला.

मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील नांदेड, मालेगाव आणि अमरावती येथील हिंसक घटनांच्या निषेधार्थ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सीएसटी रेल्वे स्टेशन येथील अमर जवान ज्योत या स्थळी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढत मंगल जी म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्यानतंर दंगलखोरांचा एक खास वर्ग सक्रिय होत हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. यासर्व हिंसक घटनामुळे राज्यातील हिंदू कुटुंबे आणि संस्थांचे नुकसान होत आहे. तसेच अफवांचा आधार घेऊन उघडपणे गुंडगिरी करत पोलिसांवर देखील लाठ्या-काठ्या, दगडफेक केली जात आहे. असला हिंसाचार मुंबईत होऊ देणार नाही असा इशारा मंगल जी यांनी दिला.

यावेळी मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा, विधान परिषद विरोधी पक्षनेते व आमदार प्रविण दरेकर, आमदार राहुल नार्वेकर, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींना धमकी देणाऱ्या राज आमेरावर कारवाईची मागणी: काँग्रेसचे निषेध आंदोलन

पुणे: शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बालगंधर्व चौकात निषेध...

आता २२ राज्यांमध्ये नागरिकत्व सिद्ध करावे लागणार,एसआयआर,बोगस मतदारांना वगळणार

पुणे (prab)- तब्बल २१ वर्षांनंतर नव्याने मतदार यादी तयार होणाऱ्...

पुण्यात एकाच वेळी मुळा, मुठा, खडकवासला धरणासह एकूण ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम

संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचा सशक्त उपक्रम: ‘प्रोजेक्ट अमृत’चा...

भिवंडी महापौर निवडणुकीत बंडखोरी करणा-यांवर कारवाई:भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची घोषणा

भिवंडी: भिवंडी निजामपूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या पक्षादेशा (व्हीप) विरोधात...