मुंबई – ठाणे प्रवास गतिमान करणारा मेट्रो मार्गिका ४ प्रकल्प वेळेत पूर्ण होईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Date:

मुंबई, दि. ६ : मुंबईकरांसोबतच ठाणेकरांचाही दैनंदिन प्रवास आरामदायी आणि गतिमान होण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या मेट्रो मार्गिका ४ आणि ४ अ प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, अशी ग्वाही देतानाच मुंबई महानगर परसिरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत हा प्रकल्प आमूलाग्र बदल घडवेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुंबई मेट्रो मार्गिका ४ व ४ अ या प्रकल्पासाठी जर्मनीच्या केएफडब्ल्यु विकास बँकेकडून घेण्यात येणाऱ्या कर्ज करारावर मुख्यमंत्री श्री. ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त आर. ए. राजीव आणि जर्मनीचे मुंबईतील वाणिज्यदूत जे. मोहार्ड यांनी करारावर स्वाक्षरी केली.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुसह्य होण्यासाठी मेट्रोच्या प्रकल्पांना गती दिली जात आहे. मेट्रो मार्गिका ४ आणि ४ अ साठी  केएफडब्ल्यू संस्थेने मंजूर केलेले भारतातील सर्वात जास्त रक्कमेचे कर्ज आहे. सुमारे दोन लाख प्रवासी दररोज ठाणे मुंबई प्रवास करतात. पुढील काही वर्षात मुंबईतील सार्वजनिक दळणवळण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून त्यामुळे मुंबईकराचं गतिमान प्रवासाचं स्वप्न साकार होणार असल्याचे श्री. ठाकरे यांनी सांगितले.

नगरविकास मंत्री श्री. शिंदे म्हणाले, केएफडब्ल्यू संस्था महाराष्ट्रासोबत पहिल्यांदा करार करीत आहे. हा प्रकल्प मुंबई महानगरातील प्रवाशांसाठी वरदान ठरणार असून या प्रकल्पामुळे मुंबई आणि ठाणे हे दोन महानगरे जोडली आहेत. कोरोना काळात जम्बो उपचाराच्या सुविधांच्या उभारणीत एमएमआरडीएने महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल श्री. शिंदे यांनी कौतुक केले.

यावेळी श्री. राजीव यांनी प्रास्ताविक करताना प्रकल्पाचे सादरीकरण केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपरमुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, ‘एमएमआरडीए’चे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. गोविंदराज आदी उपस्थित होते.

मुंबई मेट्रो मार्गिका ४ प्रकल्पाचे वैशिष्ट्ये :

केएफडब्ल्यु विकास बँकेकडून घेण्यात येणाऱ्या मुंबई मेट्रो मार्गिका ४ व ४- अ या प्रकल्पासाठी कर्ज करार.

५४५ दशलक्ष युरो कर्ज हे KFW या संस्थेने मंजूर केलेले भारतातील सर्वात जास्त रक्कमेचे कर्ज आहे. भारतातील इतर प्रकल्पाकरिता दिलेल्या कर्जपुरवठ्यापैकी हे कर्ज सर्वात कमी व्याजदराचे आहे.

मुंबई मेट्रो मार्गिका ४ – वडाळा-कासारवडवली आणि मार्गिका ४ – अ कासारवडवली ते गायमुख ह्या मेट्रो मार्गिकांच्या अंमलबजावकरिता केएफडब्ल्यू या जर्मन विकास बँकेकडून एकूण ५४५ दशलक्ष युरो इतक्या रक्कमेचे कर्ज इंडो जर्मन विकास सहाय्य अंतर्गत मंजूर.

केएफडब्ल्यु जर्मन सरकारची विकास बँक

केएफडब्ल्यु विकास बँक सरकारी प्रकल्प, व्यापारी बँका आणि सार्वजनिक संस्थांना वित्तीय सहाय्य देते.

कर्ज तीन भागामध्ये मंजूर

१) ३४५ दशलक्ष युरो इतकी रक्कम विकास कर्ज (Official Development Assistance) / कमी व्याज दरकर्ज (Reduce Interest Loan) म्हणून मंजूर. कर्ज २ भागामध्ये वितरित होणार. भाग १ – २५५ दशलक्ष युरो हे रोलिंग स्टॉक आणि स्वयंचलित भाडे प्रणालीच्या उभारणीसाठी. तसेच भाग २ – ९० दशलक्ष युरो निधी बहुवाहतूक परिवहन एकत्रिकरणाकरिता (Multimodal Integration) उपलब्ध होणार आहे.

२) २०० दशलक्ष युरो इतकी रक्कम अतिरिक्त विकास सहाय्य कर्ज (official Development Assistance Plus) हे इतर रेल्वे प्रणालीकरिता उपलब्ध होणार आहे.

३) २.२ दशलक्ष युरो हे परिचालन व परिरक्षण संस्था कार्यान्वित करण्याकरिता अनुदान म्हणून उपलब्ध होणार आहे.

कर्जाचे मुख्य वैशिष्ट पुढीलप्रमाणे आहेत.

अ. ५४५ दशलक्ष युरो कर्ज हे KFW या संस्थेने मंजूर केलेले भारतातील सर्वात जास्त रक्कमेचे कर्ज आहे.

ब. प्राधिकरणाने वाटाघाटी करुन विकास कर्ज (Official Development Assistance) भाग १ करिता ०.२९% आणि भाग २ करिता ०.०७% इतका व्याजदर निश्चित. २०० दशलक्ष यूरोकरीता ०.८२% इतका व्याजदर निश्चित.

भारतातील इतर प्रकल्पाकरिता दिलेल्या कर्जपुरवठ्यापैकी हे कर्ज सर्वात कमी व्याजदराचे आहे. याकरिता त्रिपक्षीय कर्ज करार – भारत सरकार आणि केएफडब्ल्यू विकास बँक व प्रकल्प करार यांच्या दरम्यान. तसेच केएफडब्ल्यु विकास बँक, महाराष्ट्र शासन आणि एमएमआरडीए यांच्या दरम्यान आणि स्वतंत्र द्विपक्षीय करार हा केएफडब्ल्यु विकास बँक आणि एमएमआरडीए यांच्यात करण्यात येणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...