सत्ता स्थापनेची पहिली बैठक यशस्वी, उद्या पुन्हा बैठक : रिमोट कंट्रोल मातोश्रीच !

Date:

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस च्या महाविकास आघाडीची पहिली बैठक या तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्रात महत्त्वपूर्ण बैठक यशस्वी रिक्त पार पडली असली तरी उद्या सुद्धा बैठक होणार आहे.

सत्ता स्थापनेबाबत चर्चेच्या सगळ्या मुद्यांवर तिन्ही पक्षांचे एकमत झालेले आहे. आता फक्त सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांची भेट घेणे एवढीच औपचारिकता उरली आहे, असे वाटत असतानाच चर्चेचे गुऱ्हाळ आणखी लांबले आहे. तिन्ही पक्षांचे एकमत होण्यासाठी अजून किमान एक दिवस लागेल असे सूत्रांनी सांगितले. परंतु मुख्यमंत्रीपदाबाबत तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व तिन्ही पक्षांनी मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान राष्ट्रवादी चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्व पक्षांनी संमती दर्शवली आहे. त्यात पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरला होता, अशी माहिती मिळत आहे. तेसच महाविकासआघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरेंनीच करावे, असा सूर या बैठकीत पाहायला मिळाला. महाविकासआघाडीच्या मंत्रीमंडळात दोन माजी मुख्यमंत्री, दोन माजी उपमुख्यमंत्री, तसेच आतापर्यंत अनेकवेळा कॅबिनेट मंत्रीपदे भूषवलेले नेते असणार आहेत. त्यामुळे अशा नेत्यांचे नेतृत्व करण्याची क्षमता केवळ उद्धव ठाकरेंमध्येच आहे, असे आघाडीतील नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सर्वसंमती झाली आहे. आपले आमदार कमी आहेत. परंतु, आपल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकणार नाही. त्यामुळे पुरेशी पदे पदरात पाडून घेताना मागे हटू नका असे स्पष्ट आदेश काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांच्या पक्षांच्या नेत्यांना दिले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे नेते अध्यक्षपदाच्या मागणीवर अडून राहिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असतील तर सत्तेचा रिमोट कंट्रोलच्या मातोश्रीच राहणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महावितरणच्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामगिरीचा ‘बिग इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरव

मुंबई: दि. २६ फेब्रुवारी २०२६ – सर्वाध‍िक अत्याधुन‍िक स्मार्ट मीटर बसवून देशात प्रथम...

अगोदर तपास करू नंतर निष्कर्ष निघेल तसा गुन्हा दाखल करू-सीआयडीचे अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर स्पष्टीकरण

पुणे-दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा सीआयडी तपास...

‘माझा मराठाची बोलु कौतुकें’

वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन...