मुंबई(प्रतिनिधी ) – वार्ड ते राज्य पातळी पर्यंत महिलांची एक जोमदार चळवळ उभारू असे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव मरियम ढवळे यांनी पदाधिकारी बैठकीत केले आहे.
यावेळी ढवळे म्हणाल्या की, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या 12 व्या राष्ट्रीय अधिवेशन तसेच जाहीर सभा निमित्त आझाद मैदान येथे झाली त्यात महिलांचा मोर्चा मुंबईत झाला. त्यात 23 राज्यातून 750 महिला सहभागी होत्या. या अधिवेशनाची प्रमुख घोषणा “आपल्या संविधानाच्या रक्षणासाठी, महिलांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी सर्व येऊया एकत्र, लढुया एकत्र, पुढे जाऊया एकत्र”. अशी होती. या अधिवेशनात देशभरात महिला नागरिक म्हणून, कामगार, कष्टकरी म्हणून आणि महिला म्हणून ज्या प्रश्नांना, अत्याचारांना तोंड देत आहेत, लढत आहेत त्यावर चर्चा झाली त्यात पुढील 03 वर्षांसाठीचा कार्यक्रम निश्चित केला. अत्याचारांशी दोन हात करणाऱ्या प. बंगाल, त्रिपुरा, केरळ, तमिलनाडु, हरियाणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमधील काही प्रातिनिधिक महिलांचा अधिवेशनात सत्कार केला गेला. अधिवेशनात 800 प्रतिनिधी व 50 महत्वाच्या व्यक्ती उपस्थित होते त्यात मंत्री, माजी मंत्री, आजी, माजी आमदार, खासदार यांचा समावेश होता. कला च्या माध्यामातून माणसांकडे पोहचणे आवश्यक आहे त्यानुषंगाने डावे विचार गाण्यातून माडण्याच्या प्रयत्न करणे असे नीला भागवत यांनी सांगितले. माझ्या शेजाऱ्यांचे काय दुःख आहेत अर्थात समाजात महिलांच्या काय अडीअडचणी आहेत त्या जाणून घेण्यासाठी आम्हाला भारतीय जनवादी महिला संघटने शिकवले असे मनोगत अनेक महिलांनी व्यक्त केले.