मुंबई(प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य होमगार्ड मध्ये 45493 होमगार्ड असून त्यात पुरुष 39651 तर स्त्री 5842 जवान कार्यरत असून त्यापैकी साधारणतः 15000 बंदोबस्त होते असे हे होमगार्ड मानधनावरून वंचित असल्याचे सूत्राकडून काळात आहे.
होमगार्ड महाराष्ट्र राज्य क्र. मस/ कार्या – 3/ 2020 / 79 दि. 10 जानेवारी 2020 रोजी महा समादेशक यांचे कार्यालय यांनी निधी उपलब्ध नसल्याने 50 % कायम स्वरूपी बंदोबस्त स्थगित करण्याचे कळविले आहे. शासनाकडून व्यावसायिक व विशेष सेवा या लेखाशिर्षाखाली निधी उपलब्ध झालेले नाही. याबाबत शासना कडे पाठपुरावा सुरु आहे त्यामुळे वरीलप्रमाणे बंदोबस्त स्थगित ठेवण्यात येत आहे. या बाबतची वस्तुस्थिती होमगार्ड निदर्शनास आणून देण्यात यावी असे 36 जिल्हा समादेशक होमगार्ड यांना पत्रक काढून कळविले आहे. या होमगार्ड यांना 670 रुपये मानधन एका दिवसाला देण्यात येते. अशा प्रकारे गेल्या 7 – 6 महिन्यापासून मानधन मिळाले नसल्याने अक्षरशः उपासमारीची वेळ होमगार्ड च्या जवानांवर येऊन ठेपली आहे.
कायदा सुव्यवस्था बंदोबस्त, वाहतूक शाखा बंदोबस्त, शहर बंदोबस्त, निवडणूक बंदोबस्त, गणपती बंदोबस्त, नवरात्री बंदोबस्त आदी बंदोबस्त देण्यात होमगार्ड यांना देण्यात येतात. सुरक्षा यंत्रणेसाठी होमगार्ड हे महत्त्वाचे अंग असले तरी त्याकडे दुर्लक्ष झाले आहे असे प्रथम दर्शनी निष्पन्न होत आहे. यात रेल्वे पोलिसांच्या मदतीसाठी 1500 जवान उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या जवानांकडून महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वापर केला जात आहे. मुंबई साठी 300, ठाणे तसेच ठाणे ग्रामीण, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यासाठी एकूण 500 तसेच राज्यासाठी 11 हजार 100 अशा रीतीने सुमारे 12 हजार जवान पोलिसांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक जवानाला वर्षांतून किमान 200 दिवस रोजगार देण्याचाही प्रयत्न केला गेला. होमगार्ड यांना पोलिस दलाला सहाय्यकारी म्हणून कामे प्रामुख्याने दिली जातात. अशात 26/11 आतंकी हल्ल्यात 1 जवान शहीद झाले आहे. अशा मानधनापासून वंचित होमगार्ड जवानांबद्दल नवनिर्वाचित महाराष्ट्र शासन मंत्रालय गृह मंत्री अनिल देशमुख काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
6 सप्टेंबर पासून मानधन दिले गेले नाही पण, आम्ही शासनाकडे निधी साठी विनंती केली असून लवकर सकारात्मक निर्णय होईल ज्या ज्या जवानांनी काम केले आहे अश्या सर्व जवानांना मानधन देण्यात येईल. – आयपीएस अधिकारी संजय पांडे, महासमादेशक, होमगार्ड महाराष्ट्र राज्य
आम्हाला गेल्या 7 – 6 महिन्यांपासून मानधन मिळालेले अजून आम्ही कर्जबाजारी झालो आहोत, संसाराचा गाडा कसा हाकायचा हा प्रश्न आमच्या समोर उपस्थित झाला आहे. – एक होमगार्ड.