मुंबई (मयूर लोणकर) : फडणवीस सरकार जाऊन ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रशासनात अनेक बदल केले आहेत. सरकार बदलल्यानंतर आता अनेक महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात सर्वात महत्वाचं म्हणजे डीजीआयपीआरमधून महासंचालक माहिती व जनसंपर्क या पदावरुन ब्रिजेश सिंग यांची उचलबांगडी केली आहे. महाविकासआघाडी सरकार आल्यावर बदल्यांमध्ये पहिला दणका ब्रिजेश सिंग यांना बसला आहे. माहिती जनसंपर्क महासंचालक या पदावर याआधी कधीही आयपीएस अधिकाऱ्यांना जबाबदारी दिली गेली नव्हती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ब्रिजेश सिंग यांना ती जबाबदारी दिली होती. या सरकारने त्यांना मूळ सेवेत परत पाठवले आहे. त्यांच्या जागी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे हे आता पदोन्नती वर डीजीआयपीआरची जबाबदारी घेणार आहेत.
अशा आहेत बदल्या राजीव जलोटा, आयुक्त विक्रीकर यांची बदली अपर मुख्य सचिव ग्रामविकास
संजीव कुमार, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांची बदली आयुक्त विक्रीकर महाराष्ट्र राज्य मुंबई
शैला ए विक्रीकर आयुक्त यांची बदली अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी, मुंबई
पी वेलरासू, सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची बदली अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका
असीम कुमार गुप्ता प्रधान सचिव ग्रामविकास यांची बदली प्रधान सचिव ऊर्जा
श्वेता सिंघल जिल्हाधिकारी सातारा यांची बदली अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे
डी डी पांढरपट्टे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची बदली महासंचालक माहिती व जनसंपर्क मुंबई
प्रवीण दराडे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांची बदली आयुक्त
जिल्हाधिकारी गडचिरोली शेखर सिंग हे सातारा जिल्हाधिकारी पदी
मंजू लक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांची बदली जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग या पदावर
मिलिंद शंभरकर आयुक्त समाज कल्याण यांची नियुक्ती जिल्हाधिकारी सोलापूर
आर बी भोसले जिल्हाधिकारी सोलापूर यांची नियुक्ती सहव्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कल्याण
नयना गुंडे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ यांची नियुक्ती आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी जिल्हाधिकारी रायगड यांची नियुक्ती अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ पुणे
आर एस जगताप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांची बदली अतिरिक्त विभागीय आयुक्त नागपूर या पदावर
मदन नागरगोजे यांची बदली संचालक माहिती व तंत्रज्ञान मुंबई