‘लाल बावटा’ चा झेंडा ५८ वर्षे सलग तलासरी पंचायत समितीवर

Date:

मुंबई / पालघर. ( प्रतिनिधी ) – नुकतेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तलासरी पंचायत समितीच्या प्रमुख पदांची निवडणूक पुन्हा एकदा जिंकली. कॉ. नंदकुमार हाडळ यांची सभापती पदी आणि कॉ. राजेश खरपडे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. तलासरी पंचायत समितीतील सर्व १० सदस्य हे आदिवासी आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष १९६२ पासून सलग ५८ वर्षे तलासरी पंचायत समिती जिंकत आला आहे हे विशेष आहे.

७ जानेवारी २०२० रोजी झालेल्या निवडणुकीत माकपने भाजपचा आणि काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करून तलासरी तालुक्यातील पंचायत समितीच्या १० पैकी ८ जागा आणि जिल्हा परिषदेच्या ५ पैकी ४ जागा जिंकल्या. पालघर जिल्ह्यात माकपने पंचायत समित्यांच्या १२ जागा आणि जिल्हा परिषदेच्या ६ जागा अशा एकूण १८ जागा जिंकल्या. २०१५च्या निवडणुकीपेक्षा पक्षाच्या ३ जागा वाढल्या. ऑक्टोबर २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत, माकपचे तरुण उमेदवार कॉ. विनोद निकोले यांनी भाजपचे विद्यमान आमदार यांचा पराभव करून डहाणू (अज) ही जागा जिंकली. डहाणूच्या विधानसभा क्षेत्रात संपूर्ण तलासरी तालुका आणि बराचसा डहाणू तालुका याचा समावेश आहे. डहाणू (पूर्वी जव्हार) ही विधानसभा जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने १९७८ नंतर झालेल्या १० पैकी ९ निवडणुकींत जिंकली आहे, फक्त २०१४ चा एकमेव अपवाद वगळता. आणखी एक सूचक बाब म्हणजे १९७८ नंतरच्या विधानसभा निवडणुकांत माकपचे ५ वेगवेगळे उमेदवार आमदार झाले आहेत. ठाणे-पालघर जिल्ह्याला ७५ वर्षांपूर्वी १९४५ मध्ये सुरू झालेल्या तेजस्वी वारली आदिवासी उठावाचा वारसा आहे. देशभर गाजलेला जमीनदार-सावकारशाहीविरुद्धचा हा लढा कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेच्या झेंड्याखाली लढवला गेला.

त्याचे उत्तुंग नेते होते कॉ. शामराव परुळेकर आणि कॉ. गोदावरी परुळेकर. हे दोघेही पुढे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कमिटीवर निवडले गेले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात १९५७ साली कॉ. शामराव परुळेकर यांची ठाणे जिल्ह्यातून लोकसभेवर खासदार म्हणून निवड झाली. कॉ. गोदावरी परुळेकर यांची १९८६ साली पाटणा येथे झालेल्या अखिल भारतीय किसान सभेच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली, अशी माहिती देण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच रेड्डी, ओबेरॉय यांना डी.लिट:टिळक विद्यापीठाचा 44 वा पदवीप्रदान सोहळा

पुणे- टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,...

आला उन्हाळा; आपले आरोग्य सांभाळा

सध्या सर्वत्र तापमान वाढत असून, उष्णतेच्या लाटेकडे दुर्लक्ष करू...