मुंबई-शिवसेनेच्या आमदार नीलमताई गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे. जोगेंद्र कवाडे यांनी माघार घेतल्याने गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे.२००२ पासून विधान परिषदेच्या त्या सदस्या आहेत. याशिवाय विविध विषय समित्यांवर देखील त्यांनी काम केल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे १७, काँग्रेसचे १६, भाजपचे २३ , शिवसेनेचे १२, लोकभारती ,शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षचा प्रत्येकी १ आमदार आहे तर, ६ अपक्ष आमदार आहेत. माणिकराव ठाकरे यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्यानंतर २० जुलै २०१८ पासून उपसभापतिपद रिक्त होते. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेना नेत्या डॉ. निलमताई गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज (सोमवाऱ) संध्याकाळी चार वाजता ही अधिकृत घोषणा झाली. आज सभागृहाचं कामकाज सुरू होताच सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. विधानपरिषद उपसभापतिसाठी निलमताई गोऱ्हे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विरोधकांना विश्वासात घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. विधिमंडळाच्या नियम सहा आणि सातनुसार उपसभापतीपदासाठीच्या निवडणुकीचा कार्यक्रम एक दिवस आधी जाहीर करणं अपेक्षित होते. मात्र ही तरदूत स्थगित करण्यासंबंधी विधानकार्य मंत्री विनोद तावडे यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभागृहानं मंजूर केला. त्यानंतर सभापतींनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.काँग्रेस गटनेते शरद रणपिसे आणि काँग्रेस सदस्य जनार्दन चांदूरकर यांनी आदल्या दिवशी निवडणूक कार्यक्रम जाहीर न करता आज निवडणूक घ्यायला हरकत घेतली, मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यापूर्वी २४ जुलै १९९८ आणि १३ सप्टेंबर २००४ असे दोनदा एका दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याचा दाखला दिला आणि काँग्रेसची हरकत फेटाळून लावत स्वतःचे अधिकार वापरून निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचे घोषित केले होते
विधानपरिषदेच्या उपसभापतिपदी निलम गोऱ्हे बिनविरोध
Date: