सांस्कृतिक कार्य संचालनायच्या निष्क्रियतेमुळे पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित..!

Date:

मुंबई – राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या  निष्क्रियतेमुळे फेब्रुवारीच्या  विधिमंडळ अधिवेशनात  आर्थिक तरतूद न केल्याने सुमारे तीस हजार वयोवृद्ध  लोककलावंतांना पाच महिन्यांचे मानधन मिळाले नाही.

ही चूक उशिरा लक्षात आल्याने संबंधितांनी अखेर सध्याच्या जूनच्या अधिवेशनात ४५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करून घेतली.

आज महाराष्ट्रातील हजारो  वयोवृद्ध लोककलावंताकडे एक वेळचे जेवायला ही पैसे नाहीत.काही कलावंत अपुऱ्या औषधोपचारमुळे  मृत्युमुखी पडलेच्या घटना घडल्या आहेत.यातच सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अशा भोंगळ कारभारामुळे राज्यातील सुमारे तीस हजार वयोवृद्ध लोककलावंतांना फेब्रुवारी पासून  ते आज जून महिना संपत आला तरी मानधन मिळाले नाही.

लोकसभा निवडणुकीपूर्वी  लेखानुदान सादर करणारे विधिमंडळाचे अधिवेशन पार पडले.या अधिवेशनात नियमित योजनांवर सर्व खात्यांनी आर्थिक तरतूद करून घेतली होती. मात्र सांस्कृतिक कार्य संचालनालयाने त्या काळात आपल्या खात्याकडे वयोवृद्ध लोककलावंताच्या मानधनासाठी अधिकृत प्रस्तावच सादर न केल्याने मोठी गडबड झाली.हे संचालनालयाच्या उशिरा लक्षात आले. मात्र यामुळेपाच महिन्यापासून गरीब गरजू लोककलावंत मानधनापासून वंचित राहिला.

सध्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अनेक।वरिष्ठ अधिकारी “कार्यालयात कमी,आणि दौरे नेहमी” या प्रकारे काम करीत असल्याने अनेक योजना मध्ये अशाच अडचणी निर्माण झाल्याचे कळते.

चालू अधिवेशनात ४५कोटी रुपयांची तरतूद या मानधनासाठी करण्यात आली असून आता हे।मानधन साधारणपणे जुलै अखेर पर्यत मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील वयोवृद्ध कलावंतांना सध्या “अ-ब-क” या वर्गवारी नुसार अनुक्रमे २१००, १८०० आणि १५००रुपये दरमहा मानधन मिळते,परंतु या अधिवेशनात वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माजी मंत्री यांच्या एक प्रश्नाला उत्तर देताना लवकरच या मानधनात वाढ करण्यात येईल,असे आश्वासन विधानसभेत दिले.
महाराष्ट्रातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलाकारांना मानधन देण्याची योजना सन १९५४-५५ या वर्षांपासून राबविण्यात आली आहे. दि. आँगस्ट २०१४ रोजी दिड पटीने मानधनात वाढ करण्यात आली आहे.सन २०१६१७ पासून इबीटी प्रणालीव्दारे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांना थेट त्यांच्या खात्यात मानधन देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.परंतु चार -पाच महिने जर मानधन मिळत नसेल तर याचा उपयोग काय..! असे मानधनाचा लाभ घेणाऱ्या कलावंताचे म्हणणे आहे.
सध्या राज्यात लोककलावंताना संघटीत करण्याच्या नावाखाली शेकडो संघटना रजिस्टर झाल्या आहेत.पण फक्त वर्गणी घेवून पैसे गोळा करण्याचा धंदा काही लोककलावंताच्या संघटनांच्या नेत्यांनी सुरू केले आहे.कधी लोककलावंताच्या प्रश्नावर निदर्शन नाही..कधी रस्त्यावर उतरून आंदोलनं नाही.त्यामुळे सांस्कृतिक कार्य खातं केवळ आणि केवळ लोककलावंतावर अन्याय करीत असल्याचे एक तमाशा फड मालकाने स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शशिकांत सुतारांच्या पुत्राने ठाकरेंना दिला मोठा हादरा, संजय भोसलेसह भाजपात केला प्रवेश

मुरलीधर मोहोळ,गणेश बिडकर,श्रीनाथ भिमाले यांच्या निवडणूक रणनीतीने महापालिकेच्या राजकारणात...

प्रशांत जगताप स्वार्थी: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुभाष जगताप म्हणाले…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार , प्रशांत जगताप यांनी...

प्रशांत जगताप यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ?

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष...