मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे म्हणाले- या प्रकरणात एकच आरोपी, पीडित महिला बेशुद्ध असल्याने तिचा जबाब घेता आला नाही

Date:

मुंबई-साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झालेला आहे. पोलिसांनी आरोपी चौहानला ताब्यात घेतले आहे. आरोपी हा उत्तर प्रदेश येथील मूळचा राहणारा आहे. या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये या प्रकरणात एकच आरोपी असल्याचे पुढे आले आहे. एका सक्षम अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांची एक विशेष टीम या प्रकरणाचा तपास करणार आहे.

पुढील एक महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे. मुंबई येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेमंत नगराळे यांनी सांगितले की, अत्यावस्थ असल्याने पीडित महिलेचा जबाब पोलिसांना घेता आला नाही. त्यामुळे तिच्यासोबत नेमके काय घडले याबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत. परंतू, आमचा तपास सुरु आहे. पोलीस तपासात सर्व बाबी पुढे येतील. 9 सप्टेंबरच्या रात्री 3.20 वाजता पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला (कंट्रोल रुम) एक फोन आला. हा फोन मुबईतील साकिनाका येथील खैरानी रोड परिसरात असलेल्या एका कंपनीच्या चौकीदाराचा होता. त्याने इथे एका महिलेला जबरी मारहाण सुरु असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली.

नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्याला घटनास्थळी पाठविण्यात आले. पोलिस घटनास्थळी पोहोचताच लक्षात आले की महिलेची प्रकृती अत्यंत अत्यावस्थ आहे. त्यामुळे पोलिसांनी चौकीदाराकडून एका टेम्पोची चावी घेऊन महिलेला स्वत: टेम्पो चालवत राजावाडी रुग्णालयात दाखल केले. घटनेची भीषणता लक्षात घेऊन साकीनाका पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी कामाला लागले. त्यांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेतले, अशीही माहिती हेमंत नगराळे यांनी या वेळी दिली. पोलिसांनी आरोपी विरोधात 307,376, अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पीडित महिलेच्या मृत्यूनंतर 302 अन्वये हत्येच्या आरोपाचा गुन्हाही पोलिसांनी आरोपीविरोधात दाखल केला असल्याचे नगराळे यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अनधिकृत बांधकामांबाबत अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करा:स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

नियमित सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याची स्थायी समितीची सूचना ...

कचरा प्रकल्प उभारण्यासाठी ग्रामपंचायतींना सात दिवसांची मुदत

पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर ‘एमआयटी’च्या...

शरद पवार, पार्थ पवार, रामदास आठवले,विनोद तावडे, ज्योती वाघमारे,माया ईवनाते आणि रामराव वडकुते राज्यसभेवर

मुंबई- महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी जाणाऱ्या नेत्यांची नावे आता समोर...