मुंबई दि.१४- मुंबईतील कोळीवाडा, धारावी भेंडीबाजार आदींसारख्या सारख्या दाट लोकवस्ती असलेल्या तसेच गर्दीच्या भागात कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांना आता आधुनिक ड्रोनची मदत मिळणार आहे. या विशेष ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोलिस सामाजिक अंतर ( सोशल डिस्टेंन्सिंग )लागू करतील. अशा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज व्यक्त केला.
पोलिसांनी आज कोळीवाडा भागात या ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक मंत्री महोदयांना दाखविले. यावेळी पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था )विनय चौबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील कोल्हे ,अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू,
पोलीस उपायुक्त (संचलन) प्रणय अशोक, पोलीस उपायुक्त ( झोन ५) श्रीमती नियती दवे व इतर अधिकारी उपस्थित होते.
कोरोना साथीच्या आव्हानांनमध्ये लॉकडाऊन काळात सामाजिक अंतर ( सोशल डिस्टेंन्सिंग )लागू करतानाच कायदा व सुव्यवस्थेवरही बारीक लक्ष ठेवण्याचं आहे.
“या नवीन, मोठ्या ड्रोन च्या सहाय्याने लोकवस्तींमधे पोलीस सहजतेने व गतीने पोहोचून लक्ष ठेऊ शकतील. या ड्रोन मध्ये असलेल्या
उद्घोषणा प्रणालीने (Announcement system )पोलिस जनतेला सूचना,निर्देश सुध्दा देऊ शकतील. यात व्हिडिओ रेकॉर्डिंग ची सुविधा असल्याने पोलिसांना मोठी मदत होईल.
भारतात सरासरी दर ७६१ जनसंख्ये करीता एक पोलिस कर्मचारी उपलब्ध आहे. तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व गुजरात मध्ये ९५० ची सरासरी आहे. सहाजिकच पोलीस यंत्रणेवर याचा मोठा ताण पडतो. त्यामुळे अशा आधुनिक तंत्रज्ञानाची निश्चितच मदत होते.
कोरोना साथीपासून नागरिक व पोलिस – दोघांनाही सुरक्षित ठेवण्याची जवाबदारी राज्य सरकारची आहे. “ड्रोन तंत्रज्ञानाचा हा त्याच दृष्टीने उचललेलं पाऊल आहे.”
आकाशातील हे ड्रोनरुपी डोळे मुंबई पोलीसांना सामाजिक अंतर लागू करण्यात मदत करतील.
लॉक डाऊन काळात परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांना आधुनिक ड्रोनची मदत गृहमंत्री अनिल देशमुख
Date:

