जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालयाच्या मुंबई विभागाने 35.11 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट प्रकरण उघडकीस आणले

Date:

मुंबई, 6 जुलै 2022

वस्तू आणि सेवा कर गुप्तचर  महासंचालनालयाच्या मुंबई विभागाने, शनिवार, 2 जुलै 2022 रोजी मे. इमेंसा मल्टीव्हेंचर्स प्रा. लि.आणि इतर सहा कंपन्यचे संचालक अमनपुनीत सिंग कोहलीला सीजीएसटी कायदा 2017 च्या तरतुदींअंतर्गत अटक केली.   वस्तू आणि सेवा कर गुप्तचर  महासंचालनालयाच्या मुंबई विभागानुसार, अमनपुनीत सिंग कोहली हे इतर अनेक कंपन्यांचे प्रमुख आणि सूत्रधार आहेत, ज्या त्यांनी डमी मालकांद्वारे चालवल्या आहेत.  या कंपन्यांसाठी कोणत्याही वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता, मिळवलेल्या  इनव्हॉइसच्या आधारे फसवणूक करून बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्याच्या आणि वापरल्याच्या आरोपावरून कोहलीला अटक करण्यात आली.

वस्तू आणि सेवा कर गुप्तचर  महासंचालनालयाच्या मुंबई विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की ‘तपासादरम्यान गोळा केलेल्या विविध दस्तावेज पुराव्यांच्या आधारे हे निश्चित झाले आहे कि  अमनपुनीतसिंग कोहली हा या फसवणुकीमागचा मुख्य सूत्रधार होता आणि त्याने बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्याच्या हेतूने या 14 कंपन्या सुरु केल्या होत्या.  दिल्ली आणि मुंबई येथे असलेल्या शेल कंपन्यांकडून त्याच्याद्वारे संचालित 14 कंपन्यांच्या नावाने खोट्या  पावत्या मिळवणे आणि त्याआधारे बनावट  इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवणे ही पद्धत या प्रकरणात अवलंबली  होती. अमनपुनीत सिंग कोहलीने त्यांच्या 14 कंपन्यांमध्ये अंदाजे 35.11 कोटी रुपयांचा  अवैध  आयटीसी जमा केल्याचा आरोप आहे.

निवेदनात पुढे असे म्हटले  आहे की, ‘अमनपुनीत सिंग कोहली मालाच्या निर्यातीचा दावा करून हा आयटीसी मिळवेल  आणि त्यानंतर आयजीएसटी  परतावा मिळवेल.  अमनपुनीत सिंग कोहली याने मिळवलेल्या आयजीएसटी  परताव्याची एकूण रक्कम 17.09 कोटी रुपये इतकी (अंदाजे) आहे.

महासंचालनालयानुसार, तपासादरम्यान, अमनपुनीत सिंग कोहली याने अजिबात सहकार्य केले नाही आणि त्याला अनेकदा  समन्स बजावूनही तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहिला नाही.  त्यानंतरच्या तपासात असेही समोर आले की अमनपुनीत सिंग कोहली त्याच्या ज्ञात पत्त्यांवरून फरार झाला होता आणि तो सापडला नाही. आंतर-संस्थांचे  सहकार्य , समन्वय आणि निरंतर  प्रयत्नांमुळे त्याचा थांगपत्ता शोधता आला.

अमनपुनीत सिंग कोहलीला COFEPOSA कायदा, 1974 अंतर्गत एका वर्षासाठी ताब्यात घेण्यात आले आणि इतर संस्थांकडूनही त्याची चौकशी सुरु  आहे.

या प्रकरणी वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाच्या मुंबई विभागाकडून पुढील तपास सुरु आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भाजपतर्फे माधुरी सहस्त्रबुद्धे,योगेश मुळीक यांनी ठाकरेंच्या सेनेकडून परेश खांडके वसंत मोरे यांनी अर्ज भरला

पुणे : महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी यादी...

पहाटेची थंडी अन चहावाल्याचा आग्रह.. अजितदादांनी मग घेतला चहाचा आस्वाद, अन मारल्या दुधावर गप्पा

📍 बारामती उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आज बारामती दौऱ्यावर असून...

शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या अत्याधुनिक नूतन वास्तूचे उद्घाटन बारामतीत

बारामती: विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या ‘शरदचंद्र पवार सेंटर...

वार्षिक स्नेहसमेलनातून विद्यार्थ्यांच्या जीवनमूल्यांचा विकास.,,,, डॉ. काशिनाथ बांगर.

पुणे:शाळेतील स्नेहसंमेलन हा एक सांस्कृतिक कार्यक्रम असून विद्यार्थ्यांना कलाविष्कार...