बहुआयामी शिक्षण … काळाची गरज !

Date:

काही वर्षांपूर्वी पर्यंत असा एक समज जनमानसात होता की ‘मुलांना  इंजिनीअर बनायचं असेल तर त्याने किंवा तिने Biology विषय १०वी नंतर घेऊच नये. उगाच कशाला अभ्यासाला विषय वाढवा….’  परंतू २०२० साल उजाडले आणि असे सर्वच (गैर)समज कोलमडून पडले. कोरोना ची लागण नक्की कशी होतीये… आयसोलेट व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं आणि काय करायचं नाही? हे करोना प्रकरण नक्की कधी संपणार? एक ना अनेक शंका आणि भीती नागरिकांना मध्ये पसरली.  जीवशास्त्रज्ञांचा सुद्धा सुरुवातीचा काही काळ कोरोना चा प्रसार कसा होतो ह्याचा अंदाज बांधण्यात आणि अभ्यासात गेला. कालांतराने जशी नागरिकांमधील भीती कमी होत गेली तसं ‘चाय पे चर्चा’ मध्ये क्रिकेट मधल्या डावपेचांवर भाष्य करणारे “घरोघरचे जाणकार” आता हर्ड इम्युनिटी कशी आणि कधी येईल आणि शासनाने नक्की काय धोरण राबवावे ह्यावर आपली परखड मतं मांडू लागले. “आता हर्ड इम्म्युनिटी येईल रे दोन महिन्यात ….. थांब तू जरा…. तापमान ४० अंश सेल्सिअस च्या वर जाऊदेत एकदा…. मग करोना कसा मरतो बघ….” ह्या आणि अशा अनेक संवादाचे पेव फुटले. नुसतेच भारतात नाही तर अगदी जगभर हीच परिस्थिती होती. आम्हाला दहावी नंतर जीवशास्त्राचा काही उपयोग नाही असे म्हणणारे लोक, जीवशास्त्रातल्या अगदी क्लिष्ट संकल्पना सुद्धा समजून घेऊ लागले. आपल्या शरीरामध्ये अवयवांचे कार्य कसे चालते? नक्की काय केल्याने समाजाला आपली मदत होऊ शकेल ह्याचे विचार होऊ लागले. कोणी शास्त्रज्ञ कोरोना टेस्टिंग किट्स बनवायला लागले, काही संगणक आणि भौगोलिक शास्त्रज्ञांनी मिळून नवीन प्रणाली विकसित केली ज्यामुळे कोरोना रुग्ण आपल्या आजूबाजूला कुठे आहेत, त्यांची तब्बेत कशी आहे? ह्याचा मागोवा घेणे शक्य झाले, तर काहींनी अगदी अविरत पणे लोकांची सेवा केली, अन्नदान केले नवनवीन पद्धतीने मनोरंजन केले. जे सांगून सुद्धा शक्य झाले नव्हते ते एका सूक्ष्मजीवाने नकळत पणे घडवून आणले. ह्या दोन वर्षांच्या कालावधीत काही काळासाठी का होईना, शास्त्र, वित्त आणि कला शाखांच्या मधल्या सीमारेषा धूसर झाल्या. इथून पुढे अनेक रोगांच्या साथी येतील आणि जातील. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने माणूस त्यावर नक्की मात करू शकेल ह्यात शंका नाही.

असं म्हणतात की  निसर्ग हा सगळ्यात मोठा शिक्षक आहे. ह्या निसर्गाकडे जर आपण सजगतेने पाहिले तर आपल्या लक्षात येते की अभ्यासांमधल्या सीमारेषा ह्या मानवनिर्मित आहेत. इतर कुठलीच प्रजाती अशा सीमारेषा बाळगत नाही. उदाहरणादाखल आपण हिमालयात आढळणारे आयबेक्स प्राणी बघुयात. हिमालयातील तीव्र डोंगर उतारांवरून बखूबी बागडताना गणितातील अनेक प्रमेयांचा वापर ते अगदी नकळतपणे करतात. तसेच इतक्या थंड प्रदेशात शरीरातील उष्णता कायम ठेवण्यासाठी उष्मागतिकी सिद्धांत त्यांना अंगीभूत असतात. वनस्पतींमध्ये देखील हवामातील बदल ओळखून त्यानुरूप अन्नाचे साठे करणे किंवा विशिष्ठ प्रकारची रसायने बनवणे याचे ठोकताळे ठरलेले असतात. सूक्ष्मजीव आपल्या भोवतालची परिस्थिती ओळखून रासायनिक संदेशां मार्फत आजूबाजूच्या नातेवाईकांशी संभाषण प्रस्थापित करतात. थोडक्यात काय, तर कुठल्याही भाषेच्या अथवा सीमारेषेच्या पलीकडे खरे शास्त्र सुरु होते आणि फुलते. अनेक द्रष्ट्या संशोधकांनी हे हेरले आणि आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमीच्या पलीकडे जाऊन आपला अभ्यास सुरु ठेवला. उपलब्ध असलेल्या सोयी  सुविधा, पैसा अडका ह्या कशाचाही अडसर न आणता अविरतपणे आपले काम केले आणि अशातूनच एखादा जॉर्ज कार्व्हर निर्माण झाला.

विज्ञानाच्या रुंदावणाऱ्या कक्षा आणि माहिती-तंत्रज्ञानाचे वाढते जाळे ह्यांमुळे जवळपास सर्वच विषयातील माहिती आता सहज उपलब्ध होऊ शकते. परंतु एखादी गोष्ट नुसतीच माहित असणे आणि त्या गोष्टीची अभ्यासपूर्वक मीमांसा करणे ह्यातील फरक केवळ शास्त्रशुद्ध शिक्षणानेच भरून काढता येऊ शकतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, आता शिक्षण पद्धती मध्ये सुधार करणे ही काळाची गरज बनली आहे. इथून पुढे शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना माहिती पुरवण्या पेक्षा सुद्धा, उपलब्ध माहितीचा वापर कसा करता येईल ह्यावर भर देणे जास्ती महत्वाचे ठरेल. किंबहुना उपलब्ध माहितीचा बहुआयामी विचार आणि समांतर विस्तार ह्याचा वापर अभ्यासक्रमात करणे उपयोगी ठरेल. औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र किंवा जैवतंत्रज्ञान विषयात शिक्षण हे अशाच संकल्पनेतून पुढे आले आहे. सदर अभ्यासांमध्ये, जीवशास्त्रामधील संकल्पनांचा उपयोग करून आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अनेक जीवनावश्यक गोष्टींची निर्मिती केली जाऊ शकते. तसेच निसर्ग संवर्धनासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. उदाहरणादाखल सांगायचे तर बिया विरहीत द्राक्ष उत्पादन, lnsulin सारख्या रसायनांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन किंवा विक्रमी वेळेत कोरोना virus प्रतिबंधाच्या लसीचे उत्पादन हे नमूद करता येईल. 

तात्पर्य असे की इथून पुढचा येणारा काळ हा आंतरविद्याशाखीय अभ्यासाचा असणार आहे. हे हेरून आता विविध विद्यापीठे आपल्या अभ्यासक्रमांमध्ये जास्तीत जास्त अंतर्विद्या विषयांचा समावेश करत आहेत. ह्याच संकल्पनेतून पुण्यातील MIT-WPU ह्या विद्यापीठाने सर्व इंजिनियरींग च्या शाखांना जीवशास्त्र विषय बंधनकारक केला आहे. विद्यापीठामध्ये आगामी काळात जीवशास्त्र विषयातील अनेक नवनवीन पदवी आणि पद्व्युत्तर शिक्षणाच्या संधी तसेच देशातल्या आणि विदेशातल्या नावाजलेल्या संस्था, विद्यापीठे, संशोधक आणि सक्षम शिक्षकांकडून मार्गदर्शन उपलब्ध करण्यासाठी एक स्वतंत्र जीवशास्त्र विभाग स्थापन करण्यात आला आहे. ह्या विभागाअंतर्गत बायोटेक्नोलॉजी विषयात बीएससी तसेच एमएससी आणि पीएचडी च्या संधी उपलब्ध होतील. शिवाय सूक्ष्मजीवशास्त्र विषयात एमएससी आणि पीएचडी करणे पण शक्य होईल. चालू काळाची गरज ओळखत, MIT-WPU मधील सर्व जीवशास्त्राचे अभ्यासक्रम नावाजलेल्या विदेशी संशोधन संस्थांबरोबर संयुक्त विद्यमाने घेण्याचे प्रयत्न विद्यापीठ करीत आहे. ह्यामुळे विद्यापीठामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शेवटच्या शैक्षणिक वर्षासाठी संयुक्त संस्थेमध्ये राहून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा पर्याय खुला राहील.

अखेरीस असे म्हणता येईल की विविध शाखांमधल्या सीमारेषा काढून टाकून एकत्रित अभ्यासाला प्रोत्साहन देण्याचं मोलाचं काम आणि संशोधक आणि व्यावसायिकांकडून थेट शिक्षण घेणे शक्य असल्याने, वरील सर्व अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये मोलाचे काम करतील ह्यात शंका नाही. 

Dr. Neha Shintre

Assistant Professor

Ph.D. Microbiology

School of Biology,

MIT World Peace University

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माणिकराव कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी:मुख्यमंत्र्यांच्या शिफारसीला राज्यपालांची मंजुरी

मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांचे क्रीडा खाते...

घरातच केली हायड्रोपोनिक गांजा ची लागवड -साडेतीन कोटीचा गांजा जप्त

पुणे : ३१ डिसेंबर च्या पार्ट्यांचे आयोजने सुरु असताना...

“आयुष्यावर बोलू काही” आणि बावधन-कोथरूड भूषण पुरस्कार सोहळा गुरुवारी

पुणे: राष्ट्रसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी आणि...

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची प्रखर टीकामुंबई-उबाठा...