‘मुळशी पॅटर्न’चा खतरनाक टीजर प्रदर्शित

Date:

अभिजित भोसले जेन्युइन प्रॉडक्शन्स एल. एल. पी. आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. निर्मित बहुचर्चित‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाचा खतरनाक असा दुसरा टीजर प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे यांचे लेखन, दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाबद्दल ‘अराररारा खतरनाक’ गाण्यामुळे निर्माण झालेली उत्कंठा या टीजर मुळे अधिकच ताणली गेली आहे. ‘देऊळ बंद’ च्या यशानंतर प्रविण तरडे यांचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा चित्रपट आहे.

काही दिवसांपूर्वी ‘मुळशी पॅटर्न’ च्या पहिल्या टीजर मध्ये चित्रपटाचा आशय मांडला आहे. या टीजरला नेटकऱ्यानी डोक्यावर घेतले आहे, तर या दुसऱ्या टीजर मधून चित्रपटातील काही व्यक्तिरेखांची ओळख झाली आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता ओम भूतकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात त्याचा आजपर्यंत कधीही न बघितलेला असा अतिशय हटके लुक बघायला मिळतो. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये,प्रविण तरडे, सविता मालपेकर, सुनील अभ्यंकर अशा तगड्या कलाकारांसह क्षितीश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुरेश विश्वकर्मा, दीप्ती धोत्रे, मिलिंद दास्ताने, अजय पुरकर, जयेश संघवी, अक्षय टांकसाळे, बालकलाकार आर्यन शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर अभिनेत्री मालविका गायकवाड हा नवा चेहरा ‘मुळशी पॅटर्न’ मधून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. ‘मुळशी पॅटर्न’ची गीते ‘देऊळ बंद’ ची हळवी गाणी लिहिणारे गीतकार प्रणित कुलकर्णी यांची असून संगीतकार नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केली आहेत. नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांचे आहे, तर छायाचित्रण महेश लिमये यांचे आहे.

अतिशय धारदार, भारदस्त संवादातून लक्ष वेधून घेणाऱ्या या टीजर मध्ये विविध गटांमध्ये संघर्ष सुरु असल्याचे दिसते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करतानाच गुन्हेगारी बद्दल काही सांगू पाहणाऱ्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स एल. एल. पी. आणि किरण दगडे पाटील प्रॉडक्शन आहेत. ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये नक्क्की काय दडले आहे? हे येत्या २३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्राला कळणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

त्रिभुवन सहकार विद्यापीठाच्या माध्यमातून सहकार क्षेत्र आगामी काळात सक्षम होईल : केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे:सहकाराला शास्त्रशुद्ध पद्धतीने दिशा देण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालयाने पुढाकार...

‘एअरबस’च्या ‘एच-१३० हेलिकॉप्टर फ्युसेलाज’ निर्मितीसाठी‘महिंद्रा एअरोस्ट्रक्चर्स’ची निवड;

एअरबस हेलिकॉप्टर्सच्या युरोपमधील कारखान्यांसाठी मार्च २०२७ पासून असेंब्लीज होणारवितरित.नवी...

120 कोटी मोबाईल वापरकर्त्यांना स्वतःच्या मोबाईल ओळखीवर मिळणार नियंत्रण आणि सुरक्षा

नागरिकांच्या तक्रारीनंतर जवळपास 30 लाख मोबाईल उपकरणे वापरासाठी प्रतिबंधित...