पौड(प्रतिनिधी)ः- मुळशी तालुका भारतीय जनता पक्षाच्या तालुका संपर्कप्रमुकपदी जामगावचे आदर्श सरपंच हनुमंत चंद्रकांत सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे. मावळ चे आमदार व भाजपा जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भेगडे,खडकवासला विधान सभा मतदार संघाचे प्रभारी माजी आमदार शरद ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन तालुका अध्यक्ष अशोक साठे यांनी ही निवड केली आहे.
भाजपाच्या पौड येथील कार्यालयात त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी माजी आमदार शरद ढमाले,माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय सुर्वे,तालुका अध्यक्ष अशोक साठे,पुणे कृषी उत्पन्न बाजार समि तीचे गोरख दगडे,जेष्ठनेते श्रीपतराव कंधारे,तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कुरपे,सरचिटणीस विनायक ठोंबरे,
प्रचार व प्रसिध्दी तालुका अध्यक्ष पप्पूशेठ कंधारे,बाबासाहेब बुचडे,भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस नवनात पारखी आदि यावेळी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीषजी बापट,भाजपा जिल्हा अध्यक्ष आ.बाळासाहेब भेगडे,माजी आमदार शरद ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली मुळशी तालु्नयात शासनाकडून जास्तीजास्त निधी आणून रखडलेली कामे मार्गी लावणार असल्याचे निवडीनंतर हनुमंत सुर्वे यांनी सांगितले.


