
बावधन(प्रतिनिधी)ः-भारतीय जनता पक्षाच्या मुळशी तालुका कार्याध्यक्ष पदी राजेंद्र बांदल यांची निवड करण्यात आली आहे.ही निवड मावळ तालु्न याचे आमदार व भाजपा जिल्हा अध्यक्ष आ.संजय तथा बाळासाहेब भेगडे व खडकवासला विधानसभा मतदार संघाचे प्रभारी माजी आमदार शरद ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन तालुका अध्यक्ष अशोक साठे यांनी निवड केली आहे.
नूतन भाजपा मुळशी तालुका कार्याध्यक्ष श्री.राजेंद्र बांदल यांची बांधकाम व्यावसाय व शैक्षणिक क्षेत्रात चांगली लोकप्रियता असून त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे.लोकप्रिय व समाजाभिमुख व्यक्तिमत्व,उच्चशिक्षित, विनम्र आणि अभ्यासू कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.
राजेंद्र बांदल यांच्या निवडीमुळे आगामी पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला त्यांच्या जनसंपर्काचा मोठा फायदा होणार आहे.या निवडीबद्दल राजेंद्र बांदल म्हणाले की,‘भाजपा तालुका अध्यक्ष अशोक साठे यांच्याबरोबर काम करताना येणार्या काळात मुळशी तालु्नयात ‘गाव तेथे भाजपा शाखा’ ही संकल्पना राबवून मुळशी तालु्नयात ‘शतप्रतिशत भाजपा’’ हे खर्या अर्थाने वास्तवात आणणार आहे .जिल्हाध्यक्ष मावळचे आमदार बाळासाहेब भेगडे यांच्या मावळ तालु्नयात भाजपाला जे वैभव आहे,तसेच वैभव आम्ही मुळशी तालु्नयात आणणार आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
मुळशी तालुका भाजपा कार्याध्यक्षपदी राजेंद्र बांदल यांची निवड
Date:

