महावितरणकडून क्रिकेट प्रशिक्षक चव्हाण, पॉवरलिफ्टर मनीष कोड्रा यांचा गौरव

Date:

पुणे: क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणारे व महावितरणमध्ये कार्यरत श्री. अजय चव्हाण व श्री. मनीष कोड्रा यांचा मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांच्याहस्ते गुरुवारी (दि. २८) रास्तापेठ येथील प्रशासकीय कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार, श्री. प्रकाश राऊत, कार्यकारी अभियंता श्री. माणिक राठोड, श्री. किशोर सोनपरोते, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. शिरीष काटकर उपस्थित होते.

महावितरणच्या रास्तापेठ विभागाचे सहायक लेखापाल श्री. अजय चव्हाण यांची १९ वर्षाखालील महाराष्ट्र किक्रेट संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. दिल्ली व अहमदाबाद येथे नुकत्याच झालेल्या विनू मंकड क्रिकेट चषक स्पर्धेत श्री. चव्हाण यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र संघाने १५ वर्षांनंतर थेट अंतिम फेरीत धडक दिली व स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले.

तसेच रास्तापेठ चाचणी विभागाचे तांत्रिक कर्मचारी श्री. मनीष कोड्रा यांनी औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या पॉवरलिफ्टींग स्पर्धेत ७४ किलो वजनगटात बेंचप्रेस प्रकारात १४२.५ किलो वजन उचलून विजेतेपद पटकाविले. महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टींग असोशिएशनने ही स्पर्धा आयोजित केली होती. या दोघांचेही मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांच्यासह उपस्थितांनी कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...