आरोग्याची काळजी घेत सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सज्ज राहा-मुख्य अभियंता सचिन तालेवार यांचे आवाहन

Date:

पुणे – कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे सध्याचा काळ अतिशय कसोटीचा आहे. आव्हानात्मक आहे. महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घ्यावी. नियमित व कंत्राटी सर्व कर्मचाऱ्यांचे येत्या आठवड्याभरात लसीकरण पूर्ण करावे. सोबतच कोविडची व इतर रुग्णालये, ऑक्सीजन निर्मिती व रिफिलींग उद्योग आणि घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी युद्धपातळीवर सज्ज राहावे असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी केले.

 पुणे परिमंडल अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील कोविडच्या संसर्गाबाबत मंगळवारी (दि. 20) आयोजित व्हीडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत ते बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार, श्री. प्रकाश राऊत व श्री. पंकज तगलपल्लेवार उपस्थित होते.

मुख्य अभियंता श्री. तालेवार म्हणाले की, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे कर्तव्य अहोरात्र बजावत असताना कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामध्ये प्रतिबंधात्मक उपायात कोणतीही हयगय करू नये. आरोग्याची पूर्णतः गंभीरपणे काळजी घ्यावी. थोडी लक्षणे दिसल्यावर ताबडतोब कोरोना चाचणी करून घ्यावी. पुणे परिमंडलात आतापर्यंत 511 पैकी 351 कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत तर 150 कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहे. दहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोविडबाधित कर्मचारी व कुटुंबियांना सर्व प्रकारची आवश्यक वैद्यकीय व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी परिमंडल व विभागस्तरावरील समन्वय कक्षांमार्फत कामे सुरु आहेत. पुणे परिमंडलामधील नियमित व कंत्राटी अशा एकूण 5165 पैकी 2356 कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांनी येत्या आठवड्याभरात लस घ्यावी व त्यासाठी कार्यालयप्रमुखांनी प्राधान्याने आवश्यक कार्यवाही करावी अशी सूचना त्यांनी केली.

 कोरोना संसर्गाच्या उद्रेकामुळे वर्क फ्रॉम होम सुरु झाले आहे. दुसरीकडे उन्हाच्या झळा वाढत आहे. अशा परिस्थितीत सुरळीत व अखंडित वीजपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर सज्ज राहावे अशी सूचना मुख्य अभियंता श्री. तालेवार यांनी केली. वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्थेतून ताबडतोब वीजपुरवठा सुरु करण्याच्या उपाययोजना कराव्यात. वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे वेगाने करावीत असे निर्देश मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी दिली. या बैठकीला पुणे परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंते व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...