मुंबई, महावितरण कंपनीचे संचालक (संचालन) म्हणून श्री. संजय ताकसांडे यांनी शुक्रवारी (दि. १९) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महापारेषण कंपनीचे संचालक (संचालन) म्हणून कार्यरत होते.
वीजक्षेत्रातील महत्वाच्या पदांवर सुमारे ३१ वर्षांचा अनुभव असलेले श्री. संजय ताकसांडे हे सन २००३ मध्ये सध्याच्या महावितरण व तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये कार्यकारी अभियंता म्हणून मुंबई मुख्यालयात रुजू झाले. त्यानंतर ते अधीक्षक अभियंता पदावर वसई, बुलडाणा व मुख्य अभियंता म्हणून अमरावती परिमंडल, अकोला या ठिकाणी कार्यरत होते. ऑक्टोबर २०१५ मध्ये थेट भरती प्रक्रियेतून श्री. ताकसांडे यांचीमुंबई, मुख्यालयातकार्यकारी संचालक (वितरण) पदी निवड झाली व वितरण, भारव्यवस्थापन, सामग्री व्यवस्थापन व वितरण फ्रेंचाईझी या विभागांसहपश्चिम महाराष्ट्रासोबतच विदर्भविभागाचेनियंत्रणहीत्यांच्याकडेहोते. ऑक्टोबर–२०१६मध्येप्रादेशिककार्यालयअस्तित्वातआल्यानंतरत्यांचीप्रादेशिकसंचालकपुणेयेथेनियुक्तीझाली. एप्रिल २०१९ मध्ये श्री. संजय ताकसांडे यांची महापारेषण कंपनीच्या संचालक (संचालन) पदी थेट भरती प्रक्रियेद्वारे निवड झाली व आतापर्यंत या पदावर ते कार्यरत होते. महावितरण व महापारेषणच्या सेवेत येण्यापूर्वी श्री. संजय ताकसांडे हे केंद्र शासनाच्या केंद्रीय विद्युत प्राधिकरण, नवी दिल्ली येथे तसेच पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई या ठिकाणी कार्यरत होते.
श्री. ताकसांडेयांनीआपल्या३१वर्षाच्याप्रदिर्घसेवेमध्येविविधमहत्वपूर्णजबाबदाऱ्यापारपाडल्याआहेत. त्यामध्येविशेषकरूनवितरण, पारेषण, प्रणालीसंचालन, मानवसंसाधन, सामुग्रीव्यवस्थापन, स्वंयचलनवनियंत्रण, राज्यभारप्रेषणइत्यादींचासमावेशअसूनयाक्षेत्रामध्येत्यांनीविशेषनैपुण्यप्राप्तकेलेआहे. त्यांच्यायाप्रदिर्घअनुभवाचामहावितरणलानक्कीच फायदाहोणारआहे.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी

