पुणे प्रादेशिक विभागातील वीजयोद्धांसह उत्कष्ट उपकेंद्र, डिजिटल कार्यालयांचा गौरव

Date:

पुणे, दि. 16: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात विविध आव्हानांना सामोरे जात अखंडित वीजपुरवठा व ग्राहकसेवेसाठी विशेष कामगिरी बजावणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील 16 अभियंते, तांत्रिक कर्मचारी या कोरोना वीजयोद्धांसह उत्कृष्ट उपकेंद्र व डिजिटल शाखा कार्यालयांना पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून शनिवारी (दि. 15) मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव व निसर्ग चक्रीवादळाच्या खडतर परिस्थितीत अखंडित वीजपुरवठा व ग्राहकसेवेसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मंडलनिहाय प्रत्येकी एक शाखा अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांची कोरोना वीजयोद्धा म्हणून निवड करण्यात आली. यासोबतच ग्राहकसेवा, वसुली व सुरळीत वीजपुरवठ्याच्या निकषानुसार परिमंडलनिहाय एक उपविभागीय कार्यालय, महावितरण पोर्टल व अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ काम करणाऱ्या डिजिटल शाखा कार्यालय आणि बिघाडरहित व आदर्शवत उत्कृष्ट उपकेंद्रांची देखील मंडलनिहाय प्रत्येकी एक अशी निवड करण्यात आली. प्रशासकीय सुधारणा, तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर, उत्कृष्ट ग्राहकसेवा यासह कर्मचाऱ्यांचे कौतुक व मनोबल वाढविण्यासाठी पुणे प्रादेशिक कार्यालयाने कर्मचारी व कार्यालयांच्या सन्मानाचा हा उपक्रम सुरु केला आहे.

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे यांच्याहस्ते पुणे परिमंडलमधील कोरोना वीजयोद्धा शाखा अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांसह डिजिटल शाखा कार्यालय व उत्कष्ट उपकेंद्रांना मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. ‘वीजयोद्धांचा गौरव हा प्रातिनिधीक असून पुणे प्रादेशिक विभागातील सर्वच अभियंते व कर्मचाऱ्यांनी कोरोना व निसर्ग चक्रीवादळाच्या खडतर परिस्थितीत चांगली कामगिरी बजावली आहे’, असे गौरवोद्गार काढत श्री. नाळे यांनी कौतुक केले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. पंकज तगलपल्लेवार, श्री. शंकर तायडे, सौ. पुनम रोकडे आदींची उपस्थिती होती. कोविड-19मुळे सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली व बारामती मंडलमधील कोरोना वीजयोद्धा व कार्यालयांना परिमंडल, मंडल कार्यालयांमध्ये गौरविण्यात आले.

पुणे प्रादेशिक विभागातील मंडलनिहाय कोरोना वीजयोद्धा पुढीलप्रमाणे: शाखा अभियंता / तांत्रिक कर्मचारी – विशाल नाईकनवरे / रोहित ढमाले (रास्तापेठ, पुणे), सन्नी टोपे / शेषनारायण फावडे (गणेशखिंड, पुणे), गणेश श्रीखंडे / गणेश लोखंडे (पुणे ग्रामीण), अमर कणसे / लक्ष्मण देबाजे (कोल्हापूर), अश्विनकुमारे बुचडे / गोविंद सागर (सांगली), रोहित राख / गोरख गावडे (बारामती), दत्तात्रय जरे / स्वप्निल जाधव (सातारा), हर्षवर्धन पाटील / आनंद कागदे (सोलापूर). तसेच मंडलनिहाय डिजिटल शाखा कार्यालय / उत्कृष्ट उपकेंद्र पुढीलप्रमाणे: गंगा व्हिलेज शाखा / ब्रम्हासन सिटी उपकेंद्र (रास्तापेठ, पुणे), शिवाजी हौसिंग शाखा / सुसगाव उपकेंद्र (गणेशखिंड, पुणे), आळंदी शहर शाखा / आळेफाटा उपकेंद्र (पुणे ग्रामीण), निगवे शाखा / नागाळा उपकेंद्र (कोल्हापूर), विटा शाखा 2 / कुमठे उपकेंद्र (सांगली), भाटघर शाखा / काटी उपकेंद्र (बारामती ग्रामीण), कोळेवाडी शाखा / सदर बझार उपकेंद्र सातारा (सातारा), नातेपुते शाखा 2 / अकोला उपकेंद्र (सोलापूर) परिमंडलनिहाय उत्कृष्ट उपविभागीय कार्यालय पुढीलप्रमाणे: वारजे उपविभाग (पुणे), बारामती शहर उपविभाग (बारामती), मिरज ग्रामीण 1 (सांगली).

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...