पुणे : प्रसिद्ध लेखक डॉ. मुरहरी केळे लिखित ‘नानी’ व ‘इनक्रेडीबल फादर’ या दोन पुस्तकांचे रविवारी (दि. 16) कोथरूडमधील अभिनव इंग्रजी विद्यालयात सायंकाळी 6 वाजता होणार आहे.
या प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे राहतील. यावेळी संस्कृती प्रकाशनच्या (ठाणे) ‘नानी’ या पुस्तकाचे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्याहस्ते तर ‘इनक्रेडीबल फादर’ या पुस्तकाचे जलसंधारण मंत्री ना. प्रा. श्री. राम शिंदे यांच्याहस्ते होणार आहे. सौ. आसावरी जोशी-देशपांडे (पुणे) व प्रा. डॉ. महेश खरात (औरंगाबाद) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. डॉ. मुरहरी केळे यांनी लिहिलेले ‘जगी ऐसा बाप व्हावा’ हे पुस्तक मराठी साहित्यात उल्लेखनीय ठरले. त्यास वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या पुस्तकाचा डॉ. ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी इंग्रजी भाषेत अनुवाद केला आहे. पारट्रीज-ए पेग्विन रँडम हाऊस कंपनीचे प्रकाशन असलेल्या ‘इनक्रेडीबल फादर’ या नावाने हे पुस्तक प्रकाशित होत आहे.
डॉ. मुरहरी केळे महावितरणमध्ये मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. डॉ. केळे हे मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीचे संचालक म्हणून सध्या कार्यरत आहेत. राज्याच्या वीजक्षेत्रात भिवंडी व नागपूर येथील वीज वितरण फ्रॅन्झायजीचा डॉ. केळे यांनी तुलनात्मक अभ्यास करून त्यासंबंधीचा शोधप्रबंध नागपूर विद्यापीठाला सादर केला होता. या प्रबंधावर आधारित दोन इंग्रजी पुस्तके केंद्ग शासनाच्या नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन ऑफ फरिदाबाद यांनी प्रकाशित केलेले आहेत.


