पुणे, दि. 4 : पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या महावितरणच्या प्रादेशिक संचालक पदाचा श्री. संजय ताकसांडे यांनी शनिवारी, दि. 1 ऑक्टोबरला कार्यभार स्वीकारला. याआधी ते कार्यकारी संचालक (वितरण) म्हणून मुंबई मुख्यालयात कार्यरत होते.
महावितरणच्या प्रादेशिक संचालक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पुणे, कोल्हापूर व बारामती ही तीन परिमंडले तर पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर व सांगली या जिल्ह्यांतील 55 लाख 19 हजार वीजग्राहकांचा समावेश आहे.
प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे सन 2003 मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कार्यकारी अभियंता म्हणून मुंबई मुख्यालयात रूजू झाले. त्यानंतर ते अधीक्षक अभियंता पदावर वसई, बुलडाणा व मुख्य अभियंता म्हणून अमरावती परिमंडल, अकोला या ठिकाणी कार्यरत होते. ऑक्टोबर 2015 मध्ये थेट भरती प्रक्रियेतून श्री. संजय ताकसांडे यांची कार्यकारी संचालक (वितरण) पदी निवड झाली व त्यांच्याकडे वितरण, भारव्यवस्थापन, सामग्री व्यवस्थापन व वितरण फ्रॅचाइजी या विभागाच्या संपूर्ण जबाबदारींसह राज्यातील नागपूर, गोंदिया, चंद्गपूर, अमरावती, अकोला, पुणे, बारामती व कोल्हापूर ही परिमंडले सुध्दा त्यांच्या कार्यक्षेत्रात होती.
प्रादेशिक संचालक पदावर त्यांची थेट भरती प्रक्रियेतून निवड झाल्यानंतर नव्यानेच सुरु झालेल्या पुणे येथील प्रादेशिक संचालक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक म्हणून श्री. संजय ताकसांडे रुजू झाले आहे. महावितरणच्या सेवेत येण्यापूर्वी श्री. संजय ताकसांडे हे केंद्ग सरकारच्या केंद्गीय विद्युत प्राधीकरण, नवी दिल्ली येथे तसेच पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई या ठिकाणी कार्यरत होते.


