पुणे, : टाकवे बुद्गुक (ता. वडगाव मावळ) येथील भालेराव फूडस् अॅण्ड बेवरजेस प्रा. लि. या कारखान्यात वीजमीटर यंत्रणेत फेरफार करून सुरु असलेली 19,03,413 रुपयांची वीजचोरी उघडकीस आली. या प्रकरणी दोघांविरुद्ध शुक्रवारी (दि. 2) फौजदारी गुन्हा दाखल झाला.
याबाबत माहिती अशी, की राजगुरुनगर विभाग अंतर्गत टाकवे ब्रुद्गुक (ता. वडगाव मावळ) येथील इंद्गायणी वसाहतमध्ये भालेराव फूडस् अॅण्ड बेवरजेस प्रा. लि. कारखान्याला औद्योगिक वीजजोडणी आहे. या कारखान्यातील वीजवापराबाबत संशय निर्माण झाल्यामुळे महावितरणकडून वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी करण्यात आली. यामध्ये वायरिंगमध्ये फेरफार करून वीजवापराची मीटरमध्ये नोंद कमी होईल, अशी व्यवस्था करण्यात आल्याचे आढळून आले. यात एकूण 1,43,377 युनिटची म्हणजे 19 लाख 03 हजार 413 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
ही वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता श्री. सुनील पावडे, कार्यकारी अभियंता श्री. मनीष ठाकरे, उपकार्यकारी अभियंता श्री. विजय जाधव, सहाय्यक अभियंता श्री. शाम दिवटे, सौ. प्रणोती चिंगळे, विद्युत सहाय्यक दत्तात्रेय गायसमुद्गे आदींनी योगदान दिले.
वीजचोरीप्रकरणी भालेराव फूडस् अॅण्ड बेवरजेस प्रा. लि.चे वीजग्राहक महेश जयसिंग भालेराव व वीजवापरकर्ता गिरीश रमेश गदिया या दोघांविरुद्ध शुक्रवारी (दि. 2) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


