संजय ताकसांडे महापारेषणच्या संचालक (संचालन) पदी रुजू

Date:

मुंबई : महापारेषण कंपनीचे संचालक (संचालन) म्हणून श्री. संजय ताकसांडे यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महावितरण कंपनीमध्ये पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होते.

वीजक्षेत्रातील महत्वाच्या पदांवर सुमारे 29 वर्षांचा अनुभव असलेले श्री. संजय ताकसांडे हे सन 2003 मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कार्यकारी अभियंता म्हणून मुंबई मुख्यालयात रूजू झाले. त्यानंतर ते अधीक्षक अभियंता पदावर वसई, बुलडाणा व मुख्य अभियंता म्हणून अमरावती परिमंडल, अकोला या ठिकाणी कार्यरत होते. ऑक्टोबर 2015 मध्ये थेट भरती प्रक्रियेतून श्री. संजय ताकसांडे यांची कार्यकारी संचालक (वितरण) पदी निवड झाली व त्यांच्याकडे वितरण, भारव्यवस्थापन, सामग्री व्यवस्थापन व वितरण फ्रॅचाइजी या विभागाच्या संपूर्ण जबाबदारींसह राज्यातील नागपूर, गोंदिया,चंद्रपूर, अमरावती, अकोला, पुणे, बारामती व कोल्हापूर ही परिमंडले सुध्दा त्यांच्या कार्यक्षेत्रात होती. पश्चिम महाराष्ट्राचे कार्यक्षेत्र असलेल्या महावितरणमधील पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून त्यांनी सव्वादोन वर्ष काम पाहिले आहे.

त्यानंतर नुकत्याच झालेल्या महापारेषण कंपनीच्या संचालक (संचालन) पदाच्या थेट भरती प्रक्रियेमध्ये श्री. ताकसांडे यांची निवड झाली व महापारेषण कंपनीच्या मुंबई येथील मुख्यालयात ते नुकतेच रुजू झाले. महापारेषण व महावितरणच्या सेवेत येण्यापूर्वी श्री. संजय ताकसांडे हे केंद्र सरकारच्या केंद्रीय विद्युत प्राधीकरण, नवी दिल्ली येथे तसेच पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, मुंबई या ठिकाणी कार्यरत होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मी खोटं एफआयआर केल्याचे सिद्ध झाले तर मला जेल मध्ये टाका.. रोहित पवार आक्रमक

VSR आणि विमान वाहतूक मंत्र्याचे लागेबांधे बारामती - मी...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार:रोहित पवार आक्रमक; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

व्हीएसआर कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित-युगेंद्र पवार मैदानात:बारामती पोलिस ठाण्यात दाखल; समर्थकांची गर्दी

बारामती- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार...

दिल्ली पोलिसांवर हिमाचलमध्ये गुन्हा दाखल,हिमाचल पोलीस म्हणाले,इकडे मनमानी नाही चालणार,नाकेबंदी करून थांबवले

शिमला-हिमाचल प्रदेशमध्ये दिल्ली पोलिसांवर बुधवारी एफआयआर (FIR) दाखल करण्यात...