Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

थकीत वीजबिलांच्या वसुलीशिवाय पर्यायच नाही; मोहीम आक्रमकपणे राबवा -संजय ताकसांडे

Date:

पुणे पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह ग्रामीण भागात सध्या थकीत वीजबिलांच्या वसुलीची अतिशय विदारक स्थिती आहे. सातत्याने वीज बिल थकीत ठेवण्याची मानसिकता बदलण्यासाठी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची व वसुलीची मोहीम आक्रमकपणे राबवावी, असे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले.

महावितरणच्या प्रकाशभवनमध्ये पुणे परिमंडलातील सुमारे 1500 अभियंते, अधिकारी व जनमित्रांशी प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी थेट संवाद साधला. यावेळी मुख्य अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) श्री. शंकर तायडे, महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री. अलोक गांगुर्डे, अधीक्षक अभियंते श्री. सुंदर लटपटे, श्री. पंकज तगलपल्लेवार, श्री. राजेंद्र पवार, उपमहाव्यवस्थापक (आयटी) श्री. एकनाथ चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे म्हणाले, की गेल्या दोन वर्षांपासून पुणे परिमंडलात थकबाकीदारांविरुद्ध कठोरपणे कारवाई सुरु करण्यात आली आहे. मात्र त्यात सातत्य नसल्यामुळे थकबाकी वाढत आहे. आर्थिक कोंडी वाढत आहे. ही विदारक स्थिती बदलण्यासाठी सर्व अभियंते व जनमित्रांनी कोणत्याही परिस्थितीत महावितरणचा एक रुपयाही थकीत राहणार नाही या मानसिकतेप्रमाणे काम करावे व संपूर्ण थकबाकी याच महिन्यात वसुल करावी असे निर्देश त्यांनी दिले. वसुलीच्या कामात हेतुपुरस्सर हयगय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी केली.

यासोबतच सर्वच 12 विभागांचे अभियंते व जनमित्रांसोबत प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी विभागनिहाय स्वतंत्र बैठक घेतली व संवाद साधला. यामध्ये प्रामुख्याने थकबाकीचा आढावा घेण्यात आला व वसुली संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार विजेचा अनधिकृत वापर करीत असल्यास तात्काळ फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक 7 लाख 3 हजार थकबाकीदारांकडून 133 कोटी 52 लाख रुपयांच्या वसुलीसाठी जोरदार मोहीम राबविण्यास सुरवात झाली आहे. कार्यकारी अभियंते, सर्व उपविभाग व शाखा कार्यालयप्रमुख, लेखा अधिकारी व कर्मचारी आणि जनमित्रांनी प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत थकबाकीदारांविरुद्ध कठोरपणे कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...