पुणे – महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत गणेशखिंड मंडलाचे अधीक्षक अभियंता म्हणून श्री. पंकज तगलपेल्लेवार यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. याआधीचे अधीक्षक अभियंता श्री. महेंद्र दिवाकर यांची मुंबई मुख्यालयात प्रशासकीय बदली करण्यात आली आहे.
अधीक्षक अभियंता श्री. तगलपल्लेवार हे तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात 1997 मध्ये रुजू झाले. त्यानंतर पदोन्नतीवर त्यांनी भोकर (जि. नांदेड), यवतमाळ आदी ठिकाणी काम केले आहे. थेट निवड प्रक्रियेत 2010 मध्ये त्यांची कार्यकारी अभियंता म्हणून निवड झाली. सुमारे 7 वर्ष चाचणी विभाग, संचालन व सुव्यवस्था विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून त्यांनी काम केले आहे. याशिवाय राज्याचे मा. उर्जा राज्यमंत्री यांचेकडे महावितरणचे समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. नुकत्याच झालेल्या पदोन्नतीनंतर अधीक्षक अभियंता म्हणून श्री. तगलपल्लेवार हे गणेशखिंड मंडलामध्ये रुजू झाले आहेत.

