पुणे : ज्या ग्राहकांनी महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक नवीन वीजजोडणीसाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केली आहे. फर्म कोटेशनची रक्कम भरली आहे, अशा ग्राहकांना वीजजोडणी मिळण्यास विलंब होत असल्यास त्याबाबत संबंधीत वीजग्राहकांनी तक्रार करण्याचे आवाहन महावितरणे केले आहे. यासाठी पुणे परिमंडलस्तरावर 7875767123 व 7875767058 हे दोन मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहे.
ग्राहकांनी आवश्यक व योग्य कागदपत्रांची पुर्तता करून नवीन वीजजोडणीसाठी महावितरणकडून मिळालेल्या कोटेशनची रक्कम भरल्यानंतर वीजजोडणीस विलंब होत असल्यास पुणे परिमंडलातील वीजग्राहकांना कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व वेळेत 7875767123, 7875767058 या मोबाईल क्रमांकावर वीजजोडणीच्या विलंबाबाबत माहिती देता येईल. प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्वरीत वीजजोडणी देण्याबाबत थेट परिमंडलस्तरावरून कार्यवाही करण्यात येणार आहे तसेच संबंधीत ग्राहकांना त्याबाबत कळविण्यात येणार आहे.
महावितरणच्या नवीन वीजजोडणीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी इंटरनेटवरील वेबसाईट, मोबाईल अॅप, ग्राहक सुविधा केंद्ग, उपविभागीय कार्यालये आदींच्या माध्यमातून अर्ज स्वीकारण्यात येत आहे. याशिवाय प्राप्त झालेल्या ग्राहकांच्या अर्जांवर महावितरण अंतर्गत प्रशासकीय कार्यवाही ‘ऑनलाईन’ करण्यात आली आहे. यामुळे सध्या नवीन वीजजोडणीची प्रक्रिया पूर्वीच्या तुलनेत सोपी व सुलभ झालेली आहे. नवीन वीजजोडणीसाठी ग्राहकांनी फक्त महावितरणचे संबंधीत कार्यालय, ग्राहक सुविधा केंद्ग किंवा इंटरनेट, मोबाईल अॅप या माध्यमातूनच अर्ज सादर करावेत. तसेच सर्व कागदपत्रांची पुर्तता व कोटेशनची रक्कम भरल्यानंतरही वीजजोडणीस विलंब होत असल्यास त्याची माहिती देण्यासाठी 7875767123, 7875767058 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

