मुंबई – महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या अपारंपारिक ऊर्जा खरेदी बंधनाची पूर्तता करण्यासाठी 500 मे.वॅ. पवन ऊर्जा व 1000 मे.वॅ. सौर ऊर्जा दीर्घकालिन निविदाद्वारे महावितरण खरेदी करणार आहे. या खरेदीच्या प्रकियेला मुदतवाढ देण्यात आली असून यात राज्यातील पवन व सौर ऊर्जा प्रकल्पांनी सहभागी होऊन याचा फायदा घ्यावा, असे आवाहन महावितरणने केलेले आहे.
या वीज खरेदीसाठी निविदापूर्व बैठकीतील प्रश्नांची उत्तरे महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार यात काही नियम व अटी यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. अंतिम निवडीसाठी विनंती (RFS) व वीज खरेदी करार (PPA) टीसीआयएलचे संकेतस्थळ https://www.tcil-india-electro