पुणे: महावितरणच्या पुणे परिमंडलातील विविध कार्यालये, उपकेंद्ग, कर्मचारी वसाहतींमध्ये शुक्रवारी (दि. 1) सायंकाळपर्यंत वृक्षांच्या विविध प्रजातींच्या 2488 रोपांची लागवड करण्यात आली.
पुणे परिमंडलातील तीन मंडल व 12 विभागांतर्गत आज वृक्षारोपणाचे ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी 2550 रोपे प्राप्त झाली होती. मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे, अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, श्री. महेंद्ग दिवाकर, श्री. सुनील पावडे, श्री. अरुण थोरात, श्री. वादिराज जहागिरदार, जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीचे श्री. नितीन गुजराथी यांच्यासह अभियंता, अधिकारी, कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहात सक्रीय सहभाग नोंदविला.
या मोहिमेसाठी मुख्य वनसंरक्षक श्री. जीत सिंग, सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक श्री. विवेक कुलकर्णी, पुणे महानगरपालिका उद्यान विभागाच्या सहाय्यक अधीक्षक प्रिती सिन्हा यांचे सहकार्य मिळाले व हरितमित्र परिवाराचे श्री. महेंद्ग घागरे यांनी वृक्षारोपणासाठी तांत्रिक मार्गदर्शन केले. आयोजनासाठी सहाय्यक महाव्यवस्थापक डॉ. चंद्गकांत आंबिलवादे, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. एस.ए. नेहते, श्री. शैलेंद्ग भालेराव आदींनी पुढाकार घेतला.
महावितरण अंतर्गत ज्या ज्या ठिकाणी रोपांची लागवड करण्यात आली आहे त्याठिकाणच्या रोपांचे संवर्धन करण्याची सूचना संबंधीत कार्यालयातील अभियंता, अधिकारी व कर्मचार्यांना देण्यात आली असून त्याचा आढावा घेण्यात येणार आहे.

