मुबंई -विज हाताळणी करतांना
गेल्यावर्षात 1269 लोकांची प्राणहानी झाली. विजेच्या वाढत्या मागणीसोबत या क्षेत्रात होणारे अपघात ही चितेंची बाब आहे.ग्रामीणभागात अपघाताचे वाढते प्रमाण पाहता यंत्रणेसोबतच जनतेनी देखील विदयुतसुरक्षेसाठी सहकार्य करावे असे आवाहनउर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.
यशवंतराव चव्हाण सभागृहात आजराज्यस्तरीय विदयुत सुरक्षा सप्ताहाचा उदघाटन कार्यक्रम आज उर्जामंत्र्यांच्या उपस्थितीत झाले यावेळी उर्जा राज्यमंत्री मदन येरावार याच्यासह प्रधानसचिव अरविंदसिंह, महापारेषचे व्यवस्थापकीय
संचालकराजीवकुमार मित्तल, सुत्रधारी कंपनीचेसंचालक विश्वास पाठक, रिलायन्सइन्फ्रास्टकच्रचे देवाशिष बॅनर्जी,टाटा पॉवरचेकार्यकारी संचालक अशोक सेठी, बेस्ट चेअधीकारी ओहळ ,मुख्य विदयुत निरीक्षक. सुहास बागडे उपसिथत होते.
उर्जामंत्री म्हणाले की विज उपकरणाचीहाताळणी करतांना अगदी छोटया गोष्टीमुळे,दुर्लक्षामुळे,निष्का ळजीपणामुळेअपघात होतो. 2015 साली 1600 लोकांचीप्राणहानी झाली.अपघात टाळण्यासाठीविदयुत निरीक्षक कार्यालयाने राज्यभर विदयुतअपघाताच्या धोकादायक ठिकाणाची तपासणीकरावी.या सप्ताहात महावितरण,मुख्य निरीक्षक विदयुत व खाजगी विज वितरणकंपन्यानी ही मोहीम राबवावी.शुन्य अपघात हेआपले ध्येय ठेवुन यंत्रणानी व जनतेनेही यात सहभाग घ्यावा असे आग्रही प्रतिपादन त्यांनीकेले.
शासनातर्फे विदयुत निरीक्षक कार्यालय सक्षमकरण्यात येत आहे. कार्यालयाच्या संकेतस्थळाव्दारे विदयुत सुरक्षेविषयक कामकाज अधिक लोकाभिमुख होईल अशीअपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागातील ब-याचठिकाणी डी.पी ची झाकणं उघडे राहुन अपघात होतो.महावितरणने यासाठी विशेष मोहीम घेण्याचे निर्देश ही त्यांनी दिली. सुरक्षा सप्ताहाव्दारे जाणीवजागृती होईलच मात्र यंत्रणेसोबतच लोकसहभाग असला तरचअपघात विरहीत विदयुत सुरक्षा हे ध्येय ठेवलेपाहीजे.
उर्जा हा विकासाचा कणा असल्याचे सांगुनराज्यमंत्री मदन येरावार म्हणाले की विदयुतहाताळणी करतांना ग्राहकांची व विज क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची जीवीत हानी होऊ नये.सुरक्षाविषयक बाबीचा मोठया प्रमाणावर समाजमाध्यमाव्दारे प्रचार ,प्रसार व्हावाअशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रधान सचिव अरविंद सिंह यांनी विज क्षेत्राच्यावाढत्या व्यापामुळे हाताळतांना होणाऱ्याअपघात टाळण्यासाठी गेल्या दोन वर्षापासुनहा सप्ताह आयोजित करण्यात येत असल्याचेसांगीतले.
विदयुत निरीक्षक कार्यालयाच्या www.cei.maharashtra.gov.inसंके तस्थळाचे उदघाटन यावेळीमंत्रीमहोदयांच्या उपस्थितीत करण्यातआले.तसेच अपघात विरहीत विज वितरणकरणाऱ्या अधिकारी ,कर्मचारी यांचाप्रशस्तीपत्र देवुन सन्मान करण्यात आला.