मुंबई:-
सध्या राज्यात विजेच्या मागणी एवढी वीज उपलब्ध असल्यामुळे कृषिपंप ग्राहकांना दि. 09 डिसेंबर 2017 च्या मध्यरात्रीपासून रात्री 10 तास व दिवसा 8 तास चक्राकार पध्दतीने पूर्ववत 3 फेजचा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सप्टेंबर 2017 मध्ये विविध कारणांमुळे देशात कोळशाची मोठी टंचाई निर्माण झाली होती. परिणामी पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध नसल्याने कृषिपंपांच्या वीजपुरवठ्याच्या वेळात बदल करून रात्री 8 तास व दिवसा 8 तास अशा पध्दतीने वीजपुरवठा करण्यात येत होता.
शेतकऱ्यांच्या वीजपुरवठ्यात सुसूत्रता आणण्यासाठी व वीजप्रणालीच्या सुरक्षिततेसाठी महावितरणने विभागनिहाय वेळापत्रक तयार केले असून त्याची अंमलबजावणी दि. 05 ऑक्टोबर 2017 पासून करण्यात आलेली आहे. त्यानुसार कृषिभाराचे योग्य नियोजन करून कृषिपंपाच्या वेळापत्रकात आवश्यकतेनुसार बदल करण्यात आले आहेत. डिसेंबर 2017 ते फेब्रुबारी 2018 या मासिक कालावधीत या सुधारित वेळापत्रकाची अंमलबजावणी सूरू राहणार आहे.

