थकीत वीजबिलांपोटी पाच दिवसांत 52 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Date:

पुणे, दि. 13 : पुणे परिमंडलात महावितरणने थकबाकीदारांविरोधात सुरु केलेल्या विशेष मोहिमेत गेल्या पाच दिवसांत 52 हजार 262 ग्राहकांचा वीजपुरवठा 32 कोटी 23 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला. पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यात ही कारवाई सुरु आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यासाठी मंगळवारी (दि. 14) स्थानिक सुट्टी आहे. तथापि, थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करता यावा, यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरु राहतील. तसेच थकबाकीदारांविरोधात मोहीमसुद्धा सुरु राहणार आहे.

वीजबिलांची थकबाकी वसुल करण्यासाठी महावितरणने ‘शून्य थकबाकी’ची विशेष मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेच्या पाच दिवसांत रविवार (दि. 12) पर्यंत 52 हजार 262 वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामधील 20 हजार 599 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे.

पुणे शहरातील महावितरणच्या 7 विभागांतर्गत आतापर्यंत 43 हजार 424 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 21 कोटी 60 लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांपोटी खंडित करण्यात आला आहे. यातील 19 हजार 173 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे. भोसरी व पिंपरी विभागअंतर्गत पिंपरी व चिंचवड शहरात 1818 वीजग्राहकांचा वीजपुरवठा 2 कोटी 79 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. तर यातील 201 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे. तसेच मुळशी, मंचर व राजगुरुनगर विभाग अंतर्गत मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यात 7020 ग्राहकांचा वीजपुरवठा 7 कोटी 84 लाख रुपयांच्या थकबाकीमुळे खंडित करण्यात आला आहे. यात 1225 ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे.

वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. थकीत वीजबिल भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केद्रांसह व घरबसल्या ‘ऑनलाईन’ पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घरगुती एलपीजी  सिलेंडर्सचा पुरवठा सुरळीत; टंचाईच्या भीतीने केल्या जाणाऱ्या  नोंदणीत घट- सरकारचा दावा

सरकारकडून राज्यांना व्यावसायिक एलपीजी वाटपात वाढ; प्रमुख क्षेत्रांना प्राधान्य आणि...

भोंदूबाबाला मदत करणाऱ्या सर्वांचीच नावे जाहीर करून कारवाई करा -रवींद्र माळवदकर

पुणे- भोंदू बाबा खरातला डायरेक्ट इनडायरेक्ट मदत करणाऱ्या सर्वपक्षीय...

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण:बारा हजाराहून अधिक विद्यार्थिनी व शिक्षकांनी घेतला लाभ

मुलींच्या स्वसंरक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचा उपक्रम- शालेय शिक्षण मंत्री दादाजी...

रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष मान्यता मिळवून देणार:रामदास आठवले यांचा निर्धार

पुणे ;  रिपब्लिकन पक्षाला सर्वसमावेशक स्वरूप प्राप्त करून देऊन राष्ट्रीय...