णे, दि. 11 ऑगस्ट 2017 : थकबाकी वसुलीमध्ये किंवा थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईत हयगय झाल्यास क्षेत्रीय अधिकारी, कर्मचार्यांसह त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांविरुद्धही कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिला आहे.
वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा करण्यासाठी उच्च व लघुदाब वीजग्राहकांविरोधात आक्रमक होत महावितरणने पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहिम सुरु केलेली आहे. यासंदर्भात निर्देश देताना प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी हा इशारा दिला आहे. वीजबिल भरा अन्यथा थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित होणारच हा संदेश थकबाकीदारांना या मोहिमेतून गेला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत वीजग्राहकांच्या दरमहा वीजबिलांसह थकीत रकमेची वसुली कमी झालेली आहे. ही स्थिती अत्यंत खेदजनक आहे. थकबाकी वसुलीशिवाय अन्य कोणताही पर्याय राहिलेला नाही, याची महावितरणचे अधिकारी व कर्मचार्यांनी गांभिर्याने नोंद घ्यावी. थकीत वीजबिलांच्या वसुलीमध्ये हयगय किंवा हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणार्या स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांच्यासह त्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांविरुद्धही कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिला आहे.
तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई तसेच वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. थकबाकीदारांनी वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. थकीत वीजबिल भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केद्गांसह व घरबसल्या ‘ऑनलाईन’ पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अॅपचा पर्याय उपलब्ध आहे.
दि. 12 व 13 रोजी वीजबील भरणा केंद्ग सुरु – पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्ग वीजग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी (दि. 12) व रविवारी (ता. 13) सुरु राहणार आहेत. या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुटी आहे. सद्यस्थितीत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहिम सुरु आहे. वीजग्राहकांना वीजबिलाचा व थकबाकीचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी महावितरणचे अधिकृत वीजबील भरणा केंद्ग त्यांच्या कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.