पुणे: केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमधील प्रस्तावित विविध वीज वितरण यंत्रणा सक्षमीकरण व विस्तारीकरणाची कामे उत्कृष्ट दर्जाचीच झाली पाहिजेत. निकृष्ट दर्जाची कामे आढळल्यास संबंधीत कंत्राटदार व जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीचे अध्यक्ष . गिरीश बापट यांनी गुरुवारी (दि. 26) दिले.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. सौरभ राव, आमदार श्रीमती माधुरीताई मिसाळ, आमदार श्री. राहुल कुल, आमदार श्री. भिमराव तापकीर, आमदार श्री. सुरेश गोरे, आमदार श्री. गौतम चाबुकस्वार, महापौर श्री. प्रशांत जगताप, महापौर सौ. शकुंतलाताई धराडे, आयुक्त श्री. दिनेश वाघमारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. शुक्राचार्य वांजळे, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. जय जाधव, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. राजेंद्ग जगताप, जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीचे अशासकीय सदस्य श्री. नितीन गुजराथी, श्री. संतोष सौंदणकर, श्री. विश्वास ननावरे, श्री. महेंद्ग कांबळे, श्री. भरत कुंभारकर, श्री. राजेंद्ग भुजबळ, मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे (पुणे), श्री. नागनाथ इरवाडकर (बारामती) आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री बापट म्हणाले, की केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधील वीज वितरण यंत्रणेची काम उत्कृष्ट दर्जाची होण्यासाठी वीज अधिकार्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. वीज अधिकार्यांनी लोकप्रतिनिधी व जिल्हा विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या अशासकीय सदस्यांशी संपर्क, समन्वय ठेऊन त्यांचे सहकार्य घ्यावे. काही ठिकाणी उपकेंद्गांच्या जागेसाठी आलेल्या अडचणी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या माध्यमातून लवकरच दूर केल्या जातील.
पुणे शहरात महावितरणच्या इन्फ्रा दोनमधील काही कामे पूर्णत्वाकडे आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी 8 ते 10 दिवसांच्या कालावधीसाठी पुणे महानगरपालिकेने भूमिगत वाहिन्यांसाठी खोदाईला परवानगी द्यावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी या बैठकीत केली. पालकमंत्री बापट यांनी याबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेतला जाईल असे सांगितले. पुणे जिल्ह्यातील ज्या वाड्या/वस्त्यांमध्ये वीजपुरवठा नाही, तेथे विजेची सोय उपलब्ध करून द्यावी तसेच महावितरणचा कारभार पारदर्शक, प्रभावीपणे चालविण्यासाठी आणि ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सेवा मिळावी यासाठी वीज अधिकारी व कर्मचार्यांनी तत्पर राहावे, असे आवाहन बापट यांनी केले. यावेळी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी पुणे जिल्ह्यातील विविध योजना व अंमलबजावणीबाबत माहितीचे सादरीकरण केले.
या बैठकीला पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, महावितरणचे अधीक्षक अभियंता सर्वश्री सुनील पावडे, महेंद्र दिवाकर, सुंदर लटपटे, सुभाष ढाकरे, केशव सदाकळे, संभाजी लंगोटे आदींसह कार्यकारी अभियंता, अधिकारी उपस्थित होते.