पुणे, दि. 12 : आंबेगाव तालुक्यातील महापारेषणच्या पिंपळगाव 132/33 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राचे लोकार्पण दि. 21 जुलैला राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते होणार आहे.
आंबेगाव तालुक्यातील महापारेषणचे पिंपळगाव (खडकी) 132/33 केव्ही उपकेंद्राची व पारेषण वाहिन्यांची सुमारे 27 कोटींच्या खर्चातून उभारणी पूर्ण झाली आहे. या उपकेंद्राला काठापूर 220 केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा होणार आहे. आंबेगाव तालुका व परिसराला सध्या 33/11 केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे वीजपुरवठ्यात काही तांत्रिक अडचणी उद्भवत होत्या. परंतु महापारेषणच्या या नवीन 132/33 केव्ही उपकेंद्रामुळे या सर्व परिसरातील उद्योजक, कृषीपंपधारकांसह सर्व वीजग्राहकांना यापुढे सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा होणार आहे. दि. 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्गशेखर बावनकुळे यांच्याहस्ते या 132 केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. गिरीश बापट राहतील तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार श्री. दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. विश्वासराव देवकते, उपाध्यक्ष श्री. विवेक वळसे पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
तसेच दि. 21 जुलैला ना. श्री. चंद्गशेखर बावनकुळे हे लोकप्रतिनिधींसमवेत ऊर्जाविषयक समस्यांबाबत बैठक घेणार आहेत. सकाळी 9 वाजता शिरुर तालुक्यासाठी शिरुर येथे तर दुपारी अडीच वाजता आंबेगाव तालुक्यासाठी पंचायत समिती कार्यालय, घोडेगाव येथे बैठक होणार आहे.