पुणे : महावितरणमध्ये पुणे परिमंडल हे अधिकारी व कर्मचाऱ्यांची सांघिक कामगिरी व पुणेकर वीजग्राहकांच्या सहकार्यामुळेच आघाडीवर आहे, असे प्रतिपादन मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी केले.
मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांची कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून बदली झाली. त्यानिमित्त त्यांना पुणे परिमंडलाच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अधीक्षक अभियंता श्री. महेंद्र दिवाकर, श्री. अरुण थोरात, श्री. राजेंद्र पवार, श्री. वादिराज जहागिरदार, श्री. उत्क्रांत धायगुडे, महाव्यवस्थापक श्री. अलोक गांगुर्डे, उपमहाव्यवस्थापक श्री. एकनाथ चव्हाण यांची उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख पाहुण्यांसह कामगार संघटनांचे प्रतिनिधी, अभियंता, अधिकारी आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संतोष पटणी यांनी केले व आभार मानले. कार्यक्रमाला महावितरण व महापारेषणचे अभियंता, अधिकारी, कामगार संघटनांचे पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

