पुणे – अमेरिकेतील बोस्टन स्थित सुप्रसिद्ध हारवर्ड विद्यापीठ येथे दि 22 ते 26 मे 2017 दरम्यान आयोजित “इंटरनॅशनल जर्नल फाॅर आर्ट्स अॅण्ड सायन्सेस” या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. मुरहरी केळे यांच्या पेपर्सची निवड झाली अाहे. त्यात सहभागी होण्यासाठी डॉ. केळे अमेरीकेला रवाना होत आहेत.
या परिषदेत जगभरातून विविध देशातील अनेक नामवंत संशोधक, प्राध्यापक आणि विविध विषयांतील तज्ञ सहभागी होत आहेत. डॉ. केळे हे महावितरणमध्ये मुख्य अभियंता पदावर कार्यरत असून सध्या ते मध्यप्रदेशातील पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीमध्ये संचालक (तांत्रिक) या पदावर प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. डॉ. केळे हे उच्चविद्या विभुषित असून त्यांना सामाजिक, साहित्यिक, प्रशासकीय यांसारख्या विविध क्षेत्रातील उल्लेखनिय योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
बोस्टन येथे “अॅडवान्स मिटरींग इन्फ़्रास्ट्रक्चर (ए.एम.आय.) इनेशिएटीव्ह फ़ॉर डेव्हलपिंग पॉवर डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट इन इंडीया” आणि “डेव्हलपिंग ट्रेन्ड्स इन मॅनेजमेंट ऑफ रिनेव्हेबल एनर्जी; रोल ऑफ स्मार्ट ग्रीड” या दोन विषयांवर डॉ. केळे हे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्याचे प्रतिनिधित्व करतील.

