पुणे – तुम्हाला जिवंत असल्यासारखे वाटत नसेल तर जगण्यात काही अर्थ नसतो, हे वाक्य ‘मिसेस वेस्ट इंडिया – एम्प्रेस ऑफ वेस्ट इंडिया 2022’ या सौंदर्य स्पर्धेमागील तत्त्वाचे सार आहे. ही स्पर्धा ‘दिवा पेजंट्स’चे संचालक कार्ल व अंजना मस्कारेन्हास यांच्या संकल्पनेतून साकारली आहे. यंदा या उपक्रमाचे चौथे वर्ष असून चालू वर्षातील स्पर्धा नुकतीच येथील हयात पुणे (आतिथ्य प्रायोजक) हॉटेलमध्ये उत्साहात संपन्न झाली. स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्यांतील स्पर्धकांना त्यांच्या स्वप्नाचा आविष्कार सादर करण्यासाठी प्रचंड स्पर्धात्मक असे व्यासपीठ मिळवून देण्यात आले. एकूण ३३ विवाहित महिलांना स्पर्धेने गोल्ड श्रेणीत चुरशीने सहभाग घेण्यासाठी प्रेरित केले.
अंतिम फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांची तयारी ‘दिवा’ने उत्कृष्टरीत्या करुन घेतली. अंजना व कार्ल यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली त्यांना स्वपरिचय फेरी, आवाजातील चढउतार, रंगमंचावरील वावर, प्रश्नोत्तर सत्र अशा कौशल्यांत पारंगत करण्यात आले.
परीक्षक मंडळात प्रसिद्ध चित्रपट तारका व नामवंत व्यक्ती होत्या. अंजना सुखानी (अभिनेत्री), कमल दीप शर्मा (हयात पुणेचे विक्री व विपणन संचालक), वंदना वर्मा (गृहलक्ष्मी मासिकाच्या संपादक व संचालक), विद्या तिवारी (खाद्य समीक्षक), विभूती पांडे (मिसेस वेस्ट इंडिया २०२०) व कार्ल मस्कारेन्हास (दिवाचे संचालक) यांचा त्यात समावेश होता. अभिनेते अमन यतन वर्मा यांनी आपल्या परिपूर्ण सूत्रसंचालनाने प्रेक्षकांना खिळवून टाकले.
गोल्ड श्रेणीतील विजेते :
विजेती – मिताली करंदीकर
फर्स्ट रनर अप – डॉ. मनिषा सिसोदिया
सेकंड रनर अप – डॉ. मृणाली भारद्वाज
सिल्व्हर श्रेणीतील विजेते :
विजेती – निलाक्षी लोही
फर्स्ट रनर अप – श्वेता अनिरुद्ध
सेकंड रनर अप – डॉ. उर्वशी पाटील
प्रख्यात नृत्य दिग्दर्शक पूजा सिंग यांनी या कार्यक्रमातील नृत्यांचे दिग्दर्शन व संचालन केले आणि त्याला सिसिलिया सन्याल व मृणाली तायडे यांनी सुरेख साथ दिली. कार्यक्रमात १६ महिला व पुरुषांना त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीत सर्वोत्कृष्टता प्राप्त केल्याबद्दल दिवा एक्सन्स ॲवॉर्ड्स देऊन सन्मानित करण्यात आले.
1 हयात पुणे द्वारा समर्थित
2 मीडिया पार्टनर लोकमत
3 स्माईल पार्टनर डॉ. शिल्पा खेरा – लिली व्हाईट डेंटिस्ट्री
4 NGO पार्टनर श्री अभिषेक दीक्षित – We Help Welfare Foundation
5 कास्टिंग पार्टनर श्री. अभिषेक दीक्षित – दिवा टॅलेंट हब
6 टॅरो पार्टनर मनीषा निहलन्नी
7 हेअर अँड मेक-अप पार्टनर इसास इंटरनॅशनल ब्युटी स्कूल
8 पीआर पार्टनर उषा कर्नानी – प्रेरणा
9 गिफ्टिंग पार्टनर उषा कर्नानी – मोदसूत्र
10 पोर्टफोलिओ शूट पार्टनर आनंद संपत
11 मॅगझिन पार्टनर श्री. मल्लिक इसानी – तमाशा आणि नवोपक्रम
12 सिल्व्हर श्रेणी फिनिटो फॅशन हबसाठी कॉउचर डिझायनर
13 सुवर्ण श्रेणीसाठी कॉउचर डिझायनर श्रीमती युती रावल – युरॅझल
14 गाऊन राउंड पार्टनर अॅडोर
15 वेलनेस पार्टनर श्री. परेश पारेख – निर्वावा नेचर क्युअर
16 व्हिडिओग्राफी पार्टनर श्री. जयप्रकाश पारखे – Iplus मीडिया सोल्युशन्स
17 इव्हेंट फोटोग्राफी पार्टनर श्री. स्वप्नील जावळे – एसजे इलुमिनेशन
18 भेटवस्तू भागीदार श्रीमती योगिता कोठारी – भारतातील नंबर 1 कोठारिस रॉयल ऑरगॅनिक फूड प्रॉडक्ट्सच्या संस्थापक अध्यक्षा
19 गिफ्टिंग पार्टनर श्री. आदित्य गाडिया – हॅपी ट्रीट
20 गिफ्टिंग पार्टनर कु. प्रज्ञा माझगावकर – द प्रिमिक्स कंपनी
22 गिफ्टिंग पार्टनर श्री. विशाल हिरामथ – नारायणी सिल्क
23 चॉकलेट पार्टनर सुश्री मीरा मेहता – अमताझ
24 ज्वेलरी पार्टनर सुश्री वृषाली – वृषालीची ज्वेलरी
25 अधिकृत कोरिओग्राफर आणि शो डायरेक्टर सुश्री पूजा सिंग
26 अधिकृत समन्वयक सिसिलिया सन्याल आणि मृणाली तायडे
27 अधिकृत डीजे श्री संकेत निनारिया
28 इव्हेंट कुबेर इव्हेंट्सद्वारे व्यवस्थापित