पुणे, 17 एप्रिल 2022: बाऊन्स टेनिस अकादमी व सनी वर्ल्ड यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सनी स्पोर्ट्स किंगडम-एमएसएलटीए एआयटीए 16वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या मृणाल शेळके, आस्मि टिळेकर, सलोनी पांडा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून मुख्य फेरीत प्रवेश केला.
सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट, पाषाण सुस रोड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतिम पात्रता फेरीत पुण्याच्या मृणाल शेळके हिने आपली शहर सहकारी निशिता देसाईचा टायब्रेकमध्ये 7-6(3), 6-2 असा तर, मुक्ता पाटीलने नैशा कपूरचा 6-4, 6-2 असा पराभव करून आगेकूच केली. आस्मि टिळेकरने सई जाधवचा टायब्रेकमध्ये 6-2, 7-6(5) असा संघर्षपूर्ण पराभव केला. सलोनी पांडा हिने भावना अग्रवालला 6-4, 6-1 असे पराभूत केले.
मुलांच्या गटात कौशिक कचरेने आदित्य सुर्वेचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 7-6(4) असा तर, तेज ओक याने आयुश पुजारीचा 6-1, 6-3 असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम पात्रता फेरी: मुले: अवनीश चाफळे(महाराष्ट्र)वि.वि.आदित्य भटवेरा(महाराष्ट्र)6-3 6-1; कौशिक कचरे(महाराष्ट्र)वि.वि.आदित्य सुर्वे(महाराष्ट्र)7-6(4), 7-6(4);तेज ओक(महाराष्ट्र)वि.वि.आयुश पुजारी(महाराष्ट्र) 6-1, 6-3;ओंकार शिंदे(महाराष्ट्र)वि.वि.सक्षम भन्साळी(महाराष्ट्र)6-1, 6-2;अर्जुन कीर्तने(महाराष्ट्र)वि.वि.आदित्य यादव(महाराष्ट्र) 6-1, 6-0;नीव कोठारी(महाराष्ट्र)वि.वि.आर्यन घाडगे(महाराष्ट्र)6-4, 6-3;
मुली: मृणाल शेळके(महाराष्ट्र)वि.वि. निशिता देसाई(महाराष्ट्र)7-6(3), 6-2;मुक्ता पाटील(महाराष्ट्र)वि.वि.नैशा कपूर(महाराष्ट्र)6-4, 6-2;अभिलिप्सा मल्लिक(महाराष्ट्र)वि.वि.मुक्ता सावंत(महाराष्ट्र)6-0, 6-1;सलोनी पांडा(महाराष्ट्र)वि.वि.भावना अग्रवाल(महाराष्ट्र)6-4, 6-1;आस्मि टिळेकर(महाराष्ट्र)वि.वि.सई जाधव(महाराष्ट्र)6-2, 7-6(5);ध्रुवी आद्ययंथया(महाराष्ट्र)वि.वि.आरोही देशमुख(महाराष्ट्र)6-2, 6-2.
सनी स्पोर्ट्स किंगडम-एमएसएलटीए एआयटीए 16वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत मृणाल शेळके, आस्मि टिळेकर यांचा मुख्य फेरीत प्रवेश
Date:

