पुणे: अगदी अलीकडच्या काळापर्यंत, जिनॉमिक्स किंवा प्रिसिजन मेडिसन यांचा संदर्भ कॅन्सरच्या रुग्णांशी लावला जात असे. कार्डिओव्हस्क्युलर आजारांसाठी त्यांचा वापर व प्रभावी उपयोग अतिशय कमी होता. पर्सोनॉम या जागतिक मॉलिक्युलर कंपनीने भारताच्या दृष्टिकोनातून जिनॉमिक्सच्या परिणामावर विचारमंथन करण्यासाठी भारतभरातील कार्डिऑलॉजिस्ट, सर्जन्स व फिजिशिअन्स यांच्या परिसंवादाचे आयोजन केले होते. मॉलिक्युलर जिनॉमिक तंत्रज्ञानातील नव्या घडामोडी व त्यांचा कार्डिओव्हस्क्युलर आजारांबाबत उपयोग यांचा समावेश या परिसंवादात करण्यात आला. या चर्चेचे नेतृत्व प्रा. डॉ. कॅलम मॅकरे यांनी केले. डॉ. मॅकरे इंटर्नल मेडिसिन व कार्डिओव्हस्क्युलर आजारांबाबत बोर्डाकडून प्रमाणित आहेत आणि बोस्टनमधील बीडब्लूएच जिनॉमिक्स सेंटर येथील जागतिक स्तरावर नावाजलेले कार्डिऑलॉजिस्ट व जिनॉमिक्स तज्ज्ञ असून ते हार्वर्ड मेडिकल स्कूल येथे मेडिसिनचे असोसिएट प्रोफेसर आहेत.
डॉ. मॅकरे यांनी जिन्सच्या सर्वंकष प्रोफाइलिंगवर दृष्टिक्षेप टाकत रुग्णांच्या दृष्टीने त्यांचे रोगकारक वा सौम्य असण्याबाबत महत्त्वाचे वैद्यकीय विश्लेषण केले. याद्वारे सादर करण्यात आलेल्या चाचण्या व अहवाल यांमधून रुग्णांना असलेल्या धोक्यांचे वर्गीकरण करता येते ज्याच्या आधारे रुग्णांना संबंधित रोग निर्माण होण्याची शक्यता, थेरपी व्यवस्थापन व जिनॉमिक टेस्ट डाटाच्या स्पष्टीकरणाच्या आधारे प्रोग्नोसिस याविषयी माहिती दिली जाते.
अहवाल सादर करताना, ब्रिगहॅम अँड विमेन्स हॉस्पिटलमधील (बीडब्लूएच) कार्डिओव्हस्क्युलर मेडिसिनचे चीफ प्रा. डॉ. कॅलम मॅकरे म्हणाले – “भारतीय मेडिसिनला या झपाट्याने बदलत्या व विकसित होणाऱ्या क्षेत्रामध्ये जिनॉमिक्सचा समावेश करून घेत जागतिक क्लिनिकल केअरमध्ये रूपांतरण करण्याची संधी भारताला आहे.”
रुबी हॉल क्लिनिकमधील कार्डिऑलॉजिस्ट डॉ. सी. एन मखाले यांनी सांगितले, “कार्डिओव्हस्क्युलर मेडिसिनमधील कॅसकेड टेस्टिंग व फार्माकोजिनॉमिक्समध्ये जिनॉमिक्सचे महत्त्व झपाट्याने वाढत आहे.”
कार्डिओव्हस्क्युलर सर्जन डॉ. जी. एस. नागी म्हणाले, “जिनॉमिक्स या नव्या संकल्पनेतून सर्वांना शिकण्यासारखे खूप आहे आणि प्रोग्नोस्टिकेशनमधील उत्तम साधन आहे. कार्डिओच्या संदर्भाने जिनॉमिक्सबद्दल अद्याप प्रचंड ज्ञान आपल्याला मिळवायचे आहे व या विषयात पुरावा, माहितीच्या आधारे योग्य दृष्टिकोन घडवणे अत्यावश्यक आहे.”
कार्डिऑलॉजिस्ट डॉ. इश्वर झंवर यांनी नमूद केले, “जिनॉमिक्समध्ये भारतीय लोकसंख्येत आढळणाऱ्या विविध प्रकारच्या, स्पष्ट न झालेल्या सिंड्रोमच्या बाबतीत प्रत्यक्षातील अंमलबजावणीचा दृष्टिकोन आढळतो”.
समारोप करताना, डॉ. केतन खुरजेकर म्हणाले, “पारंपरिक दृष्टीकोनाला पूरक ठरत व त्यास चालना देत जिनॉमिक्स झपाट्याने मेडिसिनमध्ये समाविष्ट होत आहे. भविष्यामध्ये जिनॉमिक्सला फार महत्त्व असणार आहे आणि त्यामुळे चांगले आरोग्य व कल्याण यांना सकारात्मक दिशा मिळणार आहे.”
पर्सोनॉमचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत औसेकर यांनी सांगितले – “प्रिसिजन मेडिसिन या दृष्टिकोनामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. रुग्णांना ते आर्थिक बाबतीतही फायदेशीर असेल. पर्सोनॉममध्ये, कार्डिओव्हस्क्युलर आजारांच्या बाबतीत मॉलिक्युलर जिनॉमिक्सवर आधारित मूल्यमापनाचे विभाजन पुढीलप्रमाणे केले आहे: अऱ्हिथिमिया, कार्डिओमायोपॅथी, फॅमिलिअल हायपरकोलेस्टेरॉलेमिया, कान्जेनिटल हार्ट डिसऑर्डर्स, फार्माकोजेनेटिक्स आणि रिस्क स्ट्रॅटिफिकेशन व प्रोग्नोसिस ऑफ सीएडी. रुग्णांच्या जेनॉमिक व बायोमार्कर स्थितींचा अभ्यास करता, सध्याच्या आरोग्यसेवा क्षेत्रामध्ये प्रचंड बदल होणार आहेत, असे पर्सोनॉमला वाटते.”
लोकांमध्ये जागृतीचे प्रमाण अजूनही वाढत असले तरीही भारतासारख्या देशात प्रिसिजन मेडिसिन या नावीन्याला मोठ्या प्रमाणात स्वीकारार्हता मिळाली आहे.