पुणे- गेली १० वर्षापासून दरवर्षी राज्यभरातील १० हजार विद्यार्थ्यांना विद्यावेतन देत रोजगार मिळवून देणाऱ्या एमपीटीए एज्युकेशन संस्थेची केंद्र सरकारच्या मानव संसाधन मंत्रालयाच्या राष्ट्रीय रोजगार निर्मिती मिशनमध्ये निवड झाली आहे .यामुळे या संथेचे कार्य आता राष्ट्रीयस्तरावर पोहोचणार आहे .आटोमोबाईल,आटोकम्प,औषधनिर्माण ,बांधकाम ,रुग्णालये,माहिती तंत्रज्ञान अशा सर्वस्तरावरील वेतनासह (स्टायपेंड )प्रशिक्षण देवून नौकरी मिळवून देण्याच्या या संस्थेच्या कामाला असलेल्या मर्यादा यामुळे नाहीश्या होणार असून येथील विद्यार्थी देशभर रोजगार मिळवण्याची क्षमता प्राप्त करणार आहेत. वय१८ते३५ आणि शिक्षण १०वी १२वीपासून कितीही असू द्यातनिवास भोजन यासह बेरोजगारांना प्रशिक्षण आणि नौकरी यातून मिळणार आहे .अशी माहिती संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सदानंद देशपांडे संचालक शेषाद्री भिर्दीकर ,आणि प्रसाद कऱ्हाडकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
अधिक माहितीसाठी – (www,mpta.in) (enquiry@mpta.in)(Mob-07387404444)

