मैलापाण्यात काम करणाऱ्यांसाठी खासदार वंदना चव्हाण यांनी संसदेत उठवला आवाज

Date:

केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणातून दिला दिलासा…

नवी दिल्ली -देशात गटार व सेप्टिक टाक्‍यांची साफसफाई करणाऱ्यांपैकी तब्बल 282 जणांचा 2016 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत मृत्यू झाला आहे, अशी कबुली केंद्र सरकारने दिली आहे. त्या विरोधात आवाज उठविल्यामुळे आता सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा पुन्हा आढावा घेऊन त्याबाबत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्‍वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले.

अर्थमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनाची अंमलबजावणी झाल्यास मैलापाण्यात काम करणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा मिळेल. त्यांचे आरोग्यही सुधारणार असून त्यांना सामाजिक प्रतिष्ठाही मिळू शकते. त्यासाठी या पुढील काळातही पाठपुरावा करणार असल्याचे खासदार वंदना चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स एम्प्लॉयमेंट ऑफ ड्राय लॅट्रिन्स (बंदी) कायदा 1993 अन्वये 25 वर्षांपूर्वीच तसेच द प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट अॅज मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अँड देअर रीहाबिलीटेशन अॅक्ट २०१३  (The Prohibition of Employment as Manual Scavengers and their Rehabilitation Act 2013) कायद्यानुसार,  हाताने मैलापाणी उचलणे, गटार आणि सेप्टिक टॅंकमध्ये उतरून काम करणे (मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग) यावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही देशात त्याचे उल्लंघन होत असल्याचे ठिकठिकाणी दिसून येत होते. त्यामुळे खासदार वंदना चव्हाण यांनी राज्यसभेत ‘मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग’ बाबत विविध प्रश्‍न उपस्थित केले होते. त्याला उत्तर देताना सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने 2016 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत देशात गटार व सेप्टिक टाक्‍यांची साफसफाई करताना तब्बल 282 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी कबुली दिली आहे. खासदार चव्हाण यांनी मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग या अतिशय महत्वाच्या व गंभीर विषयाबाबत प्रश्न उपस्थित केल्यामुळे त्याचे गांभीर्य लक्षात आल्यावर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी, मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स साठी (मैलापाण्यात काम करणारे) तांत्रिक पद्धतीचा अवलंब करण्यात येईल, त्यांना आधुनिक तंत्रज्ञान पुरविले जाईल, असे आश्‍वासन आपल्या अर्थसंकल्पीय भाषणा दरम्यान दिले.

आरोग्यावरही विपरित परिणाम :

मैलापाण्यात काम करणाऱ्यांना हायड्रोजन डायसल्फाईड, कार्बन डायऑक्‍साईड, अमोनिया आणि मिथेन यांसारख्या वायूंमुळे संसर्ग होतो. हायड्रोजन डायसल्फाईडच्या दीर्घकाळ संपर्कामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो.

 

मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग वर बंदी घालण्यासाठी पुढाकार घेतला गेला असला तरी या समुहांचा प्रश्न पुर्णत: सुटणार नाही या लोकांना आधुनिक तंत्रज्ञान वापरता यावे यासाठी त्यांना शास्त्रशुध्द पध्दीतीने प्रशिक्षित करणे देखील गरजेचे आहे ज्यामुळे त्यांनाच या नोकरया मिळू शकतील. यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे आणि यासाठी पुढच्या काळात प्रयत्न करणार असल्याचे देखील खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले.

 

सामाजिक समस्या :

मैलापाण्यात काम करणाऱ्यांना देशाच्या अनेक भागात लोक अस्पृश्‍य समजतात. म्हणूनच, समाज त्यांना स्वीकारण्यास आणि सामुदायिक कार्यात समाविष्ट करण्यास तयार होत नाही. त्यांना नोकरी मिळत नाही, लोक त्यांना घरे भाड्याने देण्यास नकार देतात. तसेच त्यांच्या मुलांबाबत देखील भेदभाव केला जातो आणि त्यांच्या पालकांप्रमाणेच तेच काम करावे, यासाठी भाग पाडले जाते.

 

मैलापाण्यात काम करणाऱ्यांची जात कनिष्ठ दर्जाची समजली जाते आणि चांगला व्यवसाय करण्यास त्यांना मज्जाव केला जातो. परिणामी मैलापाण्यातील काम त्यांच्या नैसर्गिक व्यवसायाचा एक भाग म्हणून पाहिले जाते. तसेच ग्रामीण भागातून चांगल्या उपजीविकेच्या शोधात शहरी भागात येणाऱ्या अल्पसंख्याक जनतेलाही त्याच व्यवसायात राहण्यास भाग पाडले जाते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्राजक्ता पटवर्धन यांना भाऊसाहेब स्मृती पाटणकर स्मृती पुरस्कार

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे रविवारी गौरव पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे मराठीतील आद्य...

अडचणींना सामोरे जात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घ्या : गजाला शेख

गजाला शेख लिखित ‘द फिनिक्स पाथ’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे :...

शशिकांत सुतारांच्या पुत्राने ठाकरेंना दिला मोठा हादरा, संजय भोसलेंसह भाजपात केला प्रवेश

मुरलीधर मोहोळ,गणेश बिडकर,श्रीनाथ भिमाले यांच्या निवडणूक रणनीतीने महापालिकेच्या राजकारणात...

प्रशांत जगताप स्वार्थी: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुभाष जगताप म्हणाले…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार , प्रशांत जगताप यांनी...