‘एशियन वूमन पार्लमेंटेरियन’ परिषदेत खा.अॅड.वंदना चव्हाण यांचा सहभाग
पुणे :
आशियातील महिला संसद सदस्यांसाठीच्या ‘एशियन वूमन पार्लमेंटेरियन कॉकस मीटिंग 2016’ या परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार अॅड. वंदना चव्हाण यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
कोपन हेगन (डेन्मार्क) येथे 16 मे ते 19 मे 2016 दरम्यान ही परिषद होत आहे. आशियातील राजकीय क्षेत्रातील महिला व युवतींचे सक्षमीकरण तसेच शेवटच्या स्तरापर्यंतच्या महिला आणि मुलींमध्ये लैंगिक आणि प्रजनन आरोग्य आणि अधिकार, समानता, शिक्षण, पर्यावरण आणि आर्थिक विकास या विषयी हक्कांची जाणीव व्हावी हा या परिषदेचा उद्देश आहे. ‘युनायटेड नेशन्स्’च्या ‘ग्लोबल गोल्स्’ साध्य करण्याच्या प्रयत्नांचा ही परिषद एक उपक्रम आहे.
दिनांक 19 मे रोजी खा.अॅड.वंदना चव्हाण या परिषदेत भारतातील परिस्थितीबाबत बोलणार आहेत. ‘शाश्वत विकासाचे उद्दीष्ट साध्य करताना येणारी भारतातील आव्हाने !’ हा त्यांचा विषय आहे. खा.अॅड.वंदना चव्हाण या परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. अनेक जागतिक, राष्ट्रीय परिषदांमध्ये त्या सहभागी झाल्या आहेत.
या परिषदेला ‘चौथी आंतरराष्ट्रीय वूमन डिलीव्हर कॉन्फरन्स’ असे संबोधण्यात येत आहे. भारतीय शिष्टमंडळात बरखा दत्त यांचा समावेश असून, मेलिंदा गेटस् यांच्यासारखे मान्यवरही सहभागी होणार आहेत.