पुणे:अनोखी भेट, अनोखं प्रेम हे भारतीय मतदारांकडूनच मिळू शकतंं याचा अनुभव प्रख्यात उद्योजक आणि राज्यसभा सदस्य असलेल्या खा . काकडे यांना आता जनतेत मिसळून येतो आहे . काकडे हे लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी शहर आणि परिसर पिंजून काढला . गेली ४ महिने त्यांचे हे दौरे पाहिले तर त्यांनी अनोख्या भेटी गाठी केल्यात .. असं म्हणाव लागेल .जनतेतील नेत्यांना अनेकदा आपल्या सहकाऱ्यांचं व कार्यकर्त्यांचं अनोखं प्रेम अनुभवायला मिळतं. कार्यकर्त्यांच्या या प्रेमानं नेते भावुक झालेलेही दिसतात… असं अनोखं प्रेम खासदार संजय काकडे यांना आपल्या या तथाकथित प्रचार दौऱ्यातुन अनुभवायला मिळतंय ..रविवार पेठेतील प्रकाश राऊत यांचे’ए वन हेअर ड्रेसर्स ‘नावाचे सलून आहे. प्रकाश राऊत यांनी खासदार काकडे यांना आपल्या सलुनमध्ये दाढी करण्याचा आग्रह केला. त्यानंतर खासदार काकडे यांनीही आढेवेढे न घेता दाढी केली.
लोकसभेची स्वतःची उमेदवारी सर्वप्रथम घोषित करणारे आणि प्रचाराला लागलेले ते पहिले उमेदवार ठरतील असा त्यांचा आलेख या वेळी आहे . निवडणुकीच्या दृष्टीकोनातून राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी जोरदार तयारी केली आहे. शहरातील व्यापारी व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या यानिमित्ताने त्यांनी भेटी घेतल्या व त्यांच्यासोबत चर्चा केली. आपण स्वत: व्यावसायिक असल्याने व्यापाऱ्यांच्या समस्या व त्यांच्यासमोरील आव्हाने यांची आपल्याला जाणीव आहे. यामुळे व्यापाऱ्यांवर कोणत्याही प्रकारच्या जाचक अटी न लावता पारदर्शक व निकोप स्पर्धेत व्यापार व्हावा यासाठी मी सदैव व्यापाऱ्यांसोबत असेन, असा विश्वास खासदार संजय काकडे यांनी यावेळी दिला.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून खासदार संजय काकडे पुणे लोकसभा मतदार संघातील विविध स्तरातील मान्यवरांच्या भेटी घेत आहेत. रविवार पेठेतील विविध व्यापारी, पुणे व्यापारी महासंघ व सराफ असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आदी मान्यवरांच्या त्यांनी भेटी घेतल्या. याप्रसंगी महेश तोशीवाल, गोविंद चपरवाल, लक्ष्मीकांत मणियार, कापड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उमेश झंवर, अजमानी डी एस, नानुशेठ परदेशी आणि राजु ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार फंडातून रुग्णवाहिका!
खडकी कॅन्टोन्मेंट परिसरातील नागरिकांना साप्रस (ईस्ट) उपरुग्णालयामुळे अल्प व रास्त दरात आरोग्यासंबंधी चांगले उपचार मिळतील, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी यावेळी केले. याबरोबरच या रुग्णालयास आपल्या खासदार फंडातून रुग्णवाहिका देण्यात येणार असल्याची माहितीही खासदार संजय काकडे यांनी यावेळी दिली. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनरल हॉस्पिटलअंतर्गत साप्रस (ईस्ट) खडकी नवीन उपरुग्णालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सभारंभ संपन्न झाला. यावेळी खासदार काकडे बोलत होते. याप्रसंगी संरक्षण दलाच्या दक्षिण विभागाच्या संरक्षण संपत्ती विभागाचे मुख्य संचालक एल. के. पेगु, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर एम. जे. कुमार, उपाध्यक्ष कमलेश चासकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जगताप, नगरसेवक सुरेश दादा कांबळे, मनीष आनंद, नियुक्त सदस्य कर्नल आर. एस. सिद्धु, नगरसेवक दुर्योधन भापकर, नगरसेविका पूजा आनंद, कार्तिकी हिवरकर, नगरसेवक अभय सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनींसोबत संवाद साधला.
बाउंसर ग्रुपकडून भेट व शुभेच्छा!पु
णे हे सांस्कृतिक शहर आहे. संगीत, नाटक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून शहरातील या कार्यक्रमांना सेलिब्रिटींची उपस्थिती लक्षणीय असते. यासाठी बाउंसरची आवश्यकता वाढली आणि आज पुण्यात तो एक चांगला व्यवसाय बनला आहे. ’09 बाउंसर ग्रुप’च्या सदस्यांनी खासदार काकडेंची भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचे 550 सभासद आहेत. याप्रसंगी नगरसेवक राहुल भंडारे, विशाल गायकवाड, निखील गाडे, अभिजित उकंडे व 09 बाउंसर ग्रुपचे सभासद उपस्थित होते.