पुणे- २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी खासदार आणि आमदार यांची प्रगती पुस्तके पाहण्याचे काम मोदी-शहा यांच्या यंत्रणेकडून आता वेगाने सुरु असताना पुण्यातील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट झाल्याचे वृत्त येथे पोहोचले असून या भेटीत नेमके काय घडले ? याबाबत राजकीय क्षेत्रात उत्सुकता ताणली जाते आहे .