खासदार संजय काकडे यांनी पुणे महापालिका निवडणुकीवेळी व्यक्त केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला होता. त्यामुळे गुजरात निवडणुकीच्या निकालाअगोदर खासदार यांनी वर्तविलेल्या भाकीताने सर्वत्रच आश्चर्य व्यक्त केले गेले. त्यांनी वर्तविलेला अंदाज यावेळीही खरा ठरला. सरकारविरोधी वातावरणात भाजपाची सत्ता आली तर, पंतप्रधान मोदी हे नेहरु-गांधी घराण्यापेक्षा सर्वश्रेष्ठ नेता ठरतील असे खासदार काकडे यामध्ये म्हटले आहेत. गुजरातचा निकालही तसाच लागला आणि त्याचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच जाते.
खासदार काकडे यांनी झी न्यूज ला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यामुळेच गुजरातमध्ये भाजपाची सत्ता येऊ शकते. परंतु, गेल्या 22 वर्षांपासून सलग भाजपाचे सरकार गुजरातमध्ये असल्याने प्रस्थापितांविरोधात म्हणजे सरकारविरोधात जनतेमध्ये रोष आहे. पाटीदार, दलित, मुस्लिम, ठाकूर आदी प्रमुख समाज काँग्रेससोबत गेल्याने भाजपाला सत्ता बनविणे अवघड असल्याचे चित्र सर्वेक्षणात समोर आल्याचे खासदार काकडे यांनी म्हटले आहे. अशा विरोधी वातावरणात भाजपाचे सरकार फक्त ‘मोदी मॅजिक’वरच येऊ शकते. तसे झाल्यास गुजरातमध्ये भाजपाचे सलग 27 वर्षे सरकार बनेल. मोदींची ही कामगिरी इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल आणि त्यांचा प्रसिद्धीचा आलेख सर्वाधिक मोठा होईल.
भाजपा आई, मोदी वडिलांसारखे तर, फडणवीस लहान भाऊ!
खासदार संजय काकडे यांचे गुजरात निवडणूक निकालासंदर्भात भाकीत करणे पक्ष विरोधी मानले जात असल्याबाबत विचारल्यावर खासदार काकडे यांनी मात्र हा आरोप खोडून काढला. खासदार काकडे म्हणाले की, भाजपाचा मी सहयोगी सदस्य आहे. भाजपा आपल्यासाठी आई असून पंतप्रधान मोदी आपल्याला वडिलांच्या जागी आहेत. तर, मुख्यमंत्री फडणवीस छोट्या भावाप्रमाणे आहे. आईशी कोणी गद्दारी करीत नाही. त्यामुळे पक्ष विरोधात ही कृती नसून निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आपण हा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे हे पक्षविरोधी कृत्य होऊ शकत नाही. तसेच, महापालिका निवडणुकीत सर्व विरोधी पक्षाला अंगावर घेत भाजपाची एकहाती सत्ता येण्यासाठी आपण काम केले. पक्षाचे एकाचवेळी दीड लाख सदस्य नोंदणी केली. नोटबंदी समर्थनार्थ देशातील एकमेव भव्य रॅली काढली. पक्षाच्या विरोधात आपण असतो तर, ही कामे केलीच नसती, असेही खासदार काकडे यांनी म्हटले आहे.
गुजरातमध्ये सत्ता बनविणे भाजपाला अवघड असल्याचा अंदाज सर्वेक्षणाच्या आधारे दिला असल्याची माहिती खासदार काकडे यांनी दिली आहे. ते म्हणाले आहेत की, सहा जणांनी हे सर्वेक्षण ग्रामीण व शहरी भागात केले आहे. 70 टक्के सर्वेक्षण खेड्यांमध्ये झाले आहे. शेतकरी, कामगार, मजूर, रिक्षावाला, वेटर, हॉटेल चालक, बस चालक आदी घटकांशी संवाद साधून हे सर्वेक्षण केले आहे. आपले सर्वेक्षण खोटे ठरावे आणि भाजपाची सत्ता गुजरातमध्ये यावी आणि तसे झाल्यास आपल्याला प्रचंड आनंद होईल, असेही खासदार काकडे यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.