Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

दिव्यांग अजयला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून वाढदिवसाला व्हीलचेअर भेट

Date:

  • १५ वर्षे अपघातामुळे अंथरुणावर खिळून असलेल्या अजय हिंगे पाटील व्हीलचेअरवर बसले.

पुणे- लहानपणी सहलीला गेल्यानंतर समुद्राच्या लाटेमुळे झालेल्या अपघातात कायमचे अपंगत्व आले. त्यानंतर तब्बल १५ वर्षे अंथरुणावर खिळून राहिलेल्या अजय हिंगे पाटील यांना त्यांच्या वाढदिवशी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वयंचलित व्हीलचेअरची अनोखी भेट दिली. जिद्द, चिकाटी आणि दुर्दम्य आशावादी कार्यकर्त्याला दिलेल्या या अनोख्या भेटीची चर्चा पंचक्रोशीत रंगली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोशल मीडिया सेलचे सरचिटणीस पदावर काम करणारे अजय हिंगे पाटील हे शिरूर तालुक्यातील न्हावरा येथे स्थायिक आहेत. अपघातामुळे कायमचे अपंगत्व येऊन देखील परिस्थितीला शरण न जाता जिद्दीने जीवनसंघर्ष करणारे अजय हे पक्षासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रीय काम करत आहेत. त्यांच्या या जिद्दीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पार्टीचे अनेक वरिष्ठ नेते शिरूरला आले की अजय यांची आवर्जून भेट घेतात.

या अनोख्या गिफ्टबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अजय हिंगे पाटील म्हणाले, “१५ वर्षांपूर्वी बारावी पास झाल्यानंतर रांजणगाव एमआयडीसीमध्ये एका ठिकाणी नोकरी लागली. सगळे काही सुरळीत सुरू होते. पण अचानक एक दिवस म्हणजे २० जून २००६ रोजी जीवघेणा अपघात झाला आणि सारेच संपले. तीन महिने पुण्याच्या बुधराणी रुग्णालयात उपचार सुरू होते. इतके दिवस उपचार करूनही मी पुन्हा उभा राहीन याची शाश्वती स्वतः डॉक्टरही देत नव्हते. मणक्याला गंभीर इजा झाली होती. कायमस्वरूपी झोपून रहावे लागेल हाच एकच मार्ग सांगितला. त्यानंतर हताश अवस्थेत छताकडे डोळे लावून पडून रहात होतो. कायमचे अपंगत्व आल्यामुळे मी काहीसा निराश झालो होतो.”

“आयुष्यभर झोपूनच राहणार असे जवळ जवळ निश्चित झालेल्या मला चक्क ही व्हीलचेअर वाढदिवसाची भेट म्हणून मिळाली आहे. अक्षरशः माझा पुनर्जन्मच झाल्याचा भास आज झाला. काहीजण सोशल मीडियातून, तर काहीजण फोन करून, तर कोणी प्रत्यक्ष भेटून मला शुभेच्छा देत होते. परंतु त्याचवेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ही व्हीलचेअर भेट दिली आणि जणू मला सांगितले, ‘अजयशेठ ‘नाऊ यू कॅन स्टँड’.’ माझे मन भरून आले आहे.”

“खा. कोल्हे यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक बापू पवार यांनी वेळोवेळी माझ्या पाठीवर हात ठेवून आयुष्याशी लढण्याचे बळ दिले. या बळाच्या जीवावर आणि त्यांच्या सहकार्याने आयष्यात कोणत्याही आव्हानासमोर छाती ठोकून मी उभा राहू शकतो असा विश्वास या सर्वांनी मला दिला आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

काही महिन्यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदार संघातील अनेक दिव्यांग बांधवांना आतापर्यंत आवश्यक ती साधने दिली गेली आहेत. अजय हिंगे पाटील यांचे बालमित्र सुदर्शन जगदाळे यांना ‘ऑटोमॅटिक व्हीलचेअर’ दिली गेली आहे. तब्बल पंधरा वर्षानंतर सुदर्शन स्वतःच्या पायावर उभे राहू शकत आहेत.

त्याच धर्तीवर अजय यांना देखील ऑटोमॅटिक व्हीलचेअर मिळू शकते ही बाब खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या लक्षात आली. त्यांनी त्यांच्या टीमला कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर कोल्हे यांचे स्वीय सचिव नाना सावंत, खा.सुळे यांच्या सोशल मीडिया टीमचे समन्वयक, स्टर्लिंग सिस्टिमचे संचालक सतिश पवार यांच्यासह संपूर्ण टीमने अथक प्रयत्न करून तब्ब्ल ३ लाख रुपये किमतीची व्हीलचेअर मिळवून दिली. आवश्यक त्या शासकीय परवानग्या व कागदपत्रांची पूर्तता करत व्हीलचेअर मागवून घेण्यासाठी केलेल्या सामुहिक प्रयत्नांना अखेर यश मिळाले. खासदार कोल्हे यांनी अजय हिंगे पाटील यांच्या वाढदिवसाला दिलेल्या या अनोख्या गिफ्टची चर्चा पंचक्रोशीत रंगली होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून २००+ इच्छुकांनी दिवसभरात नेले उमेदवारीसाठी अर्ज

निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज वाटप – पहिल्याच दिवशी मोठा...

पुण्यात भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची महागर्दी:पहिल्याच दिवशी दोन हजार अर्जांची मागणी…

पुणे- महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुणे शहर भारतीय जनता...

कोरियन सांस्कृतिक महोत्सवाने जिंकली पुणेकरांची मने

फॅशन शो, के-पॉप, फ्यूजन संगीत व कोरियन खाद्य-संस्कृतीच्या स्टॉलना...