४० वर्षात पहिल्यांदा केला सभात्याग : आयुक्तांकडून पाणीवाटपात दुजाभाव -आयुक्तांच्या घरात जाऊन त्यांच्या नळाचे प्रेशर तपासतो ..म्हणाले
पुणे-आज पुण्यात कालवा समितीची बैठक सुरू असताना खासदार गिरीश बापट यांनी बैठक सुरू असताना सभात्याग केला प्रशासनावर नाराजी व्यक्त करत, पाण्याचे वाटप ज्या पद्धतीने सुरु आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर त्यामुळे संशय येतो अजितदादा असे सांगत येथे बसून काय उपयोग मी सभात्याग करतो असे सांगून पुण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बापट यांनी दिला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कालवा समितीची बैठक पार पडली या मध्ये संपूर्ण शहराला सामन पाणीपुरवठा व्हावा अश्या सूचना खासदार गिरीश बापट यांनी केल्या त्यावर उपाययोजना करू असे आश्वासन संबंधीत अधिकाऱ्यांनी दिले त्यावर फक्त आश्वासन देऊन काम चालणार नाही पुण्याला समान पाणीपुरवठा झालाच पाहिजे या करता आंदोलन करावे लागेल
सध्या पुणे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे लोकांचे हाल प्रशासनाला दिसत नाहीत का असा प्रश्न खासदार बापट यांनी विचारला
पुढील तीन दिवसांमध्ये पाणीप्रश्न मार्गी लागला नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचे बापट यांनी सांगितले
आयुक्तांच्या बंगल्यावर जाऊन तपासणार बागेत आणि घरात किती प्रेशरने पाणी –
आयुक्तांच्या निवासस्थानी दुपारी ३ ते ८ पाणी पुरवठा- ४ वाजता तिथे जाणार
पाणी सोडणारे चावीवाले यांच्यावर दबाव आणून पाणी वाटपात भेदभाव
खासदार गिरीश बापट यांनी कौन्सिल हॉल च्या बैठकीतून बहिष्कार टाकल्यावर माध्यमांशी संवाद साधला ,ते म्हणाले जीव गेल्यावर हे पाणी देणार काय ? आयुक्तांच्या घरी जाऊन त्याच्या घरात नळाला किती प्रश्ने पाणी येते त्याची पाहणी करणार..काही भागाला कमी दाबाने पाणीपुरवठा,कसबा,नाना,नारायण पेठेत पाणी का नाही ?प्रशासनाचा गलथान कारभार खपवून घेणार नाही.प्रशासनाला वाटतंय,लोकप्रतिनिधी नाही,आम्हाला रान मोकळ झालंय,3 दिवसात पाणीपुरवठा सुधारला नाही तर आम्ही रस्त्यावर घेऊन येऊ नागरिकांना….मी ४० वर्षात कधी बैठकीतून सभात्याग केलाय,पहिल्यांदा सभात्याग केलाय.

