सालिम अली पक्षी अभयारण्य वाचविण्यासाठी आंदोलन

Date:

पुणे, दि. 30 ऑक्टोबर – येरवडाभागातील अतिशय जैवविविधतेने नटलेले हरित पट्टा म्हणजे डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्य आहे. त्यात सुमारे ११० विविध प्रजातीचे पक्षी या ठिकाणी येतात. डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यात स्थानिक पक्ष्यांबरोबरच परदेशी पक्ष्यांसाठी अधिवास आहे. परंतु, बेसुमार वृक्षतोड आणि कच-याचे साम्राज्य यामुळे येथील अस्तित्वच धोक्यात आले आहे. मुळा-मुठा नदीकिनारी असलेल्या डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्यात अतिक्रमण करून शेकडो-हजारो ट्रक राडारोडा टाकून येथील नालाही बुजवण्यात आला आहे. यामुळे या अभयरण्याची जैवविविधता धोक्यात आल्याने याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य बचाव समितीच्या वतीने अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, आमदार सुनील टिंगरे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, अतिरीक्त पालिका आयुक्त कुणाल खेमणार यांनी आंदोलनकर्त्यांसमवेत अभयारण्याची पाहणी केली. अधिका-यांनी त्वरित कारवाईची पावले उचलण्याचे निर्देश दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माय अर्थ फांउडेशनचे अनंत घरत, नगरसेवक बंडू तात्या गायकवाड, डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य बचाव समितीचे समीर निकम, शैलेश राजगुरू, मेघना बाफना, महेश गौडेलर, धर्मराज पाटील, प्रदीप रहेजा, बिरेन भट, राकेश जगताप, पौर्णिमा जोशी, सत्या नटराजन आदी उपस्थित होते.

सचिन अहिर म्हणाले की, अभयारण्याच्या सीमा निश्चित करुन नाल्यातील राडारोडा काढण्यात यावा, राडारोडा टाकणाऱ्यांना केवळ नोटिसा न देता, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. दिवाळीनंतर पुण्यातील विविध पर्यावरणाचे विषय घेऊन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबरोबर याविषयी मुंबईत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी, वन विभागाचे अधिकारी, पालिका आयुक्त व पर्यावरणप्रेमी संस्था आणि आंदोलनकर्त्या समितीचे सदस्य या बैठकीमध्ये निमंत्रित असणार आहेत.

अतिरीक्त पालिका आयुक्त कुणाल खेमणार यांनी याबाबत त्वरित कारवाई व गुन्हा दाखल करण्याचे निर्देश कनिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...